Local Train : लोकलच्या दिव्यांग डब्यात घुसखोरी, चार हजार जणांवर कारवाई

जानेवारी २०२३ पासून एप्रिल २०२३ पर्यंत तब्ब्ल चार हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.

273
Local Train
Local Train : लोकलच्या दिव्यांग डब्यात घुसखोरी, चार हजार जणांवर कारवाई

चार मार्गिकांवरून धावणारी मुंबईची लोकल (Local Train) शहाराची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. दर दिवसाला मुंबईत दोन हजारांहून अधिक लोकलच्या फेऱ्या होतात. या लाईफलाईनमध्ये १२ ते १५ डब्बे असतात. प्रथम श्रेणीचे, खास महिलांसाठीचे, द्वितीय वर्गाचे, सामानासाठी, आणि दिव्यांगांसाठी. यातील दिव्यांगाच्या राखीव डब्यात धडधाकट प्रवासी यांच्या घुसखोरीची प्रकरण वाढले आहे. यावर आता रेल्वे प्रशासनाने कठोर पावलं उलचण्यास सुरुवात केली आहे.

(हेही वाचा – Mumbai-Pune Sinhagad Express : मुंबई – पुणे सिंहगड एक्स्प्रेसला एक अतिरिक्त डब्बा जोडला जाणार)

मध्य रेल्वेचे पाऊल

दिवसागणिक प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत जात आहे. लोकलमधील (Local Train) दोन डबे दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. मात्र या डब्यातून धडधाकट माणसं देखील मोठ्या प्रमाणात प्रवास करतता. त्यामुळे ज्यांच्यासाठी त्या डब्यांची सुविधा देण्यात आली आहे, त्यांना डब्यात चढता येत नाही. रेल्वे सुरक्षा दलाकडे या घुसखोरीबद्दल तक्रार करण्यात आली असून त्यांनी आता दिव्यांग डब्यातील प्रवाशांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई रेल्वेतून प्रत्येक दिवशी साधारणपणे सात दशलक्षाहून अधिक माणसे प्रवास करतात.

हेही पहा

चार हजार प्रवाशांवर कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी २०२३ पासून एप्रिल २०२३ पर्यंत तब्ब्ल चार हजार प्रवाशांवर (Local Train) कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांमध्ये सरकारी कर्मचारी आणि महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

कारवाईत सातत्य हवे

सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी दिव्यांगांना डब्यात (Local Train) प्रवेश सुद्धा करता येत नाही. पोलिसांनी केवळ एकदाच कारवाई करून चालणार नाही तर कारवाईत सातत्य असायला हवे. त्या डब्यातून प्रवास करणाऱ्या सराकरी कर्मचाऱ्यांच्या संबंधित विभागांना त्याबद्दल माहिती देणे गरजेचे आहे, अशी माहिती विकलांग विकास सामाजिक संघाच्या अध्यक्षांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.