Mahavikas Aghadi : वज्रमूठ सभेबाबत काँग्रेसमध्ये साशंकता; काय म्हणाले नाना पटोले?

छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबईनंतर आता पुण्यात याच महिन्यात ही वज्रमुठ सभा होत आहे. या सभेची जबाबदारी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

190

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदापासून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे सध्या राज्यात खळबळ माजली आहे. अशातच महाविकास आघाडीच्या Mahavikas Aghadi भवितव्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. आता महाविकास आघाडीतील नेतेही यावर भाष्य करू लागले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर धक्कादायक वक्तव्य केले आहे.

काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सामना रंगल्याचे दिसून आले होते. आता, पुन्हा एकदा या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या Mahavikas Aghadi भवितव्यवर प्रश्न उपस्थित होत आहेत..महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यभर वज्रमुठ सभा घेण्याचा निर्णय एकीकडे घेण्यात आला आहे. मात्र, शरद पवार यांच्या निर्णयामुळे पुढील सभांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मुंबईतील बीकेसी मैदानावर वज्रमुठ सभा मोठ्या उत्साहात पार पडली. मात्र, या वज्रमुठ सभेची चर्चा एका रात्रीतच हवेत विरली. या घटनांवर महाविकास आघाडीतील सहाकारी पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेनेनेही आपले मत व्यक्त केले आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभांचेही पुढे काय होणार, हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पुण्यातील वज्रमुठ सभेबद्दल विचारले असता, पावसामुळे सभेबाबतचा निर्णय एकत्रित बैठक घेऊन घेतला जाईल असे त्यांनी म्हटले आहे. राज्यात सध्या विविध ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची Mahavikas Aghadi याबाबत लवकरच बैठक होईल. याबाबत बैठकीत निर्णय होईल. पुण्यातील वज्रमुठ सभा होईल की नाही याबाबत आताच सांगता येणार नाही, असे विधान नाना पटोले यांनी केले. नानांच्या या विधानाचे अनेक अर्थ लावले जात आहेत. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबईनंतर आता पुण्यात याच महिन्यात ही वज्रमुठ सभा होत आहे. या सभेची जबाबदारी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

(हेही वाचा Supriya Sule : सुप्रिया सुळे यांच्या हातात राष्ट्रवादीची सत्ता येणार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.