तुम्हाला एक प्रश्न नेहमीच पडत असेल ना की, आपण रद्दीवाल्याला रद्दी देतो मग त्यापासून पुन्हा कोरा कागद कसा घडवला जातो? खरंतर लहान असताना आपल्याला ही प्रक्रिया माहित होती. मात्र काळाच्या ओघात आपण काही गोष्टी विसरुन जातो. या प्रक्रियेला Paper Recycling Process म्हणतात.
या प्रक्रियेबद्दल तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेल. परंतु आता आम्ही तुम्हाला त्यासंबंधिचा व्हिडिओ दाखवणार आहोत, जेणेकरुन या प्रक्रियेची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल. हा व्हिडिओ कमी वेळातच खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कागद Paper निर्माण करण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवण्यात आली आहे.
(हेही वाचा Sharad Pawar : शरद पवारांच्या निर्णयावर सुधीर मुनगंटीवारांनी मारला टोला; म्हणाले… )
हर्ष गोएंका यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे. सुरुवातीला कागदाचा सर्व कचरा एका मशीनमध्ये टाकला जातो. त्यानंतर पुढील महत्वाची प्रक्रिया सुरु होते. त्याची शीट बनवली जाते. आता कच्चा कागद Paper वाळवला जातो. त्यानंतर दुसर्या मशीनमध्ये हा कागद टाकला जातो.
ही प्रक्रिया पाहण्यासाठी इथे क्लिक करा:
Fascinating to see how paper is made out of waste…. it is efforts like this which will make the world a better place! pic.twitter.com/d1IYVRPYYD
— Harsh Goenka (@hvgoenka) May 2, 2023
त्यानंतर त्याच्या कडा कापून टाकल्या जातात आणि एक चांगले स्वरुप प्राप्त होते. आणि मग कागद तयार होतो. अशा प्रकारे रद्दीद्वारे पुन्हा कागद बनवला जातो. ही प्रक्रिया खूपच रोमांचक आहे. हर्ष गोएंका यांनी हा व्हिडिओ शेअर केला आणि काही क्षणातच तो व्हायरल झाला.
Join Our WhatsApp Community