मिळालेल्या माहितीनुसार नागपाडा येथील एका रेस्टॉरंटला भीषण आग (Mumbai Fire) लागली. ही आग बुधवार ३ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास लागली. ही आग रेस्टॉरंटमध्ये लावण्यात आलेल्या चिमणीमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
#WATCH महाराष्ट्र: मुंबई के नागपाडा इलाके में एक रेस्टोरेंट में बीती रात करीब 11.30 बजे आग लगने की घटना सामने आई। अग्निशमन दल की 4 गाड़ियों ने आग पर काबू पाया। घटना में किसी के घायल होने की खबर नहीं है। प्राथमिक जानकारी के अनुसार रेस्टोरेंट की चिमनी में चिंगारी से आग लगी थी। pic.twitter.com/yHtsB8E31h
— ANI_HindiNews (@AHindinews) May 3, 2023
(हेही वाचा – Paper : रद्दीपासून पुन्हा कागद बनवण्याची भन्नाट प्रक्रिया जाणून घ्या)
घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन (Mumbai Fire) दलाला यश मिळालं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अचानक लागलेल्या आगीमुळे आसपासच्या परिसरात भितीचं वातावरण पसरलं होतं. आग नियंत्रणात आल्यानंतर अग्निशमन दलाकडून कुलिंग प्रोसेस सुरू झाली आहे. या प्रकरणाची तूर्तास एवढीच माहिती समोर आली आहे. (Mumbai Fire)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community