राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मंगळवारी, २ मेला त्यांच्या राजकीय जीवनाबाबत मोठी घोषणा केली. ‘मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार’ असल्याचे शरद पवारांनी यांनी जाहीर केले. ‘लोक माझे सांगाती राजकीय आत्मकथा’ या पुस्तक प्रकाशनावेळी शरद पवारांनी निवृत्त होण्याची घोषणा केली. याबाबत कोणतीही पुर्वकल्पना नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्काच बसला. त्यांनी यावेळी शरद पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची भावनिक साद घातली. मात्र त्यानंतरही राष्ट्रवादीची समिती निवृत्ती निर्णयाबाबत जे काही ठरवले ते मला मान्य असल्याचा निरोप शरद पवारांनी अजित पवारांना दिला. त्यानुसार अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले. मात्र तरीही अनेक राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांना हे मान्य नव्हते. (Sanjay Raut)
(हेही वाचा – Sharad Pawar Resigns: शरद पवारांच्या निवृत्तीला कोणाचा विरोध आणि कोणाचे समर्थन)
आता या सगळ्या प्रकारावरून राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. महाविकास आघाडी पक्षातदेखील अस्थिरता दिसून येत आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना दैनिकाच्या माध्यमातून एक मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीतला एक गट भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
हेही पहा –
काय म्हणाले संजय राऊत?
पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच अनेक प्रमुख नेत्यांनी अश्रू ढाळले, आकांत केला. पवारांच्या चरणाशी लोळण घेतली. ‘तुमच्याशिवाय आम्ही कोण? कसे?’ अशी विलापी भाषा केली. पण यापैकी अनेकांचा एक पाय भाजपात आहे व पक्ष अशा तऱ्हेने फुटलेला बघण्यापेक्षा सन्मानाने निवृत्ती घ्यावी असा सेक्युलर विचार पवारांच्या मनात आला असेल तर त्यात चुकीचे नाही”, असा दावा सामनातील (Sanjay Raut) अग्रलेखातून करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community