विशेष प्रतिनिधी, मुंबई
रस्त्यालगतची (ऑन स्ट्रीट) सर्व प्रस्तावित पार्किंगमध्ये पे आणि पार्क-जनरल १ हजार ९७८ ठिकाणी आणि पे आणि पार्क-निवासी १ हजार ५७३ ठिकाणी अशी मिळून एकूण ३ हजार ५५१ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. मुंबई वाहतूक पोलिस विभागाने मात्र अद्याप मुंबई वाहनतळ प्राधिकरणाला कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिलेले नाही. त्यामुळे प्रस्तावित ३ हजार ५५१ ठिकाणांच्या अंतिम निश्चितीचे धोरण लांबणीवर पडले आहे. (BMC Mumbai)
मुंबई महानगरपालिकेने (BMC Mumbai) एकात्मिक माहिती तंत्रज्ञान प्रणालीच्या माध्यमातून रस्त्यासह (ऑन स्ट्रीट), रस्त्यालगतच्या (ऑफ स्ट्रीट) तसेच इतर ठिकाणच्या पार्किंगशी (parking) संबंधित माहितीचे सर्वंकष डिजिटायजेशन करण्याच्या उद्दिष्टाने मुंबई पार्किंग पूल (एमपीपी) तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये विद्यमान तसेच प्रस्तावित अशा पार्किंगशी (parking) संबंधित प्रकल्पांची शासकीय, व्यावसायिक आणि खासगी संस्थांच्या पार्किंगची संबंधित माहिती एकत्रित केली जाणार आहे. (उदा. बेस्ट, मॉल्स आदी). महत्वाचे म्हणजे या एकाच डेटाबेसमधून संबंधित सर्व भागधारकांना पार्किंगच्या डेटाबेसचा वापर करणे सुलभ होणार आहे. मुंबईतील पार्किंग व्यवस्थापनासाठी प्रस्तावित सदर माहिती तंत्रज्ञान प्रणालीतून बृहन्मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणार आहे. पार्किंग संचलन, उपलब्ध पार्किंग जागांचा पुरेपूर वापर करण्यासह एकूणच रस्त्यांवरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.
(हेही वाचा – BMC : श्रावण हर्डीकरांनी स्वीकारला महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार)
या प्रकल्पांतर्गत (BMC Mumbai) चार टप्प्यांत (ऑन स्ट्रीट व ऑफ स्ट्रीट दोन्ही मिळून) वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र पहिल्या टप्प्यात फक्त ऑफ-स्ट्रीट पार्किंगमधील कार समतुल्य जागांचा (Equivalent Car Space-ECS) समावेश असेल. मुंबई महानगरपालिकेच्या १७ विभागांमधील ३२ ठिकाणचे सार्वजनिक वाहनतळ आणि २९ ठिकाणचे सुविधा वाहनतळ यांचा त्यात समावेश आहे.
दुसऱ्या टप्प्यात सध्याच्या ६५ ठिकाणांवरील रस्त्यालगतच्या (ऑन स्ट्रीट) कार समतुल्य जागांचा (Equivalent Car Space-ECS) आणि चार वॉर्डातील प्रस्तावित ५३० ठिकाणांचा समावेश असेल. या ५३० मध्ये पे आणि पार्क-जनरल २६३ ठिकाणी तर पे आणि पार्क-निवासी २६७ ठिकाणी समाविष्ट असेल. (BMC Mumbai)
हेही पहा –
तर तिसऱ्या टप्प्यात रस्त्यालगतची (ऑन स्ट्रीट) सर्व प्रस्तावित पार्किंग ठिकाणे समाविष्ट असतील. यामध्ये पे आणि पार्क-जनरल १ हजार ९७८ ठिकाणी आणि पे आणि पार्क-निवासी १ हजार ५७३ ठिकाणी अशी मिळून एकूण ३ हजार ५५१ ठिकाणे प्रस्तावित आहेत. मुंबई वाहतूक पोलिस विभागाने अद्याप मुंबई वाहनतळ प्राधिकरणाला कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिलेले नाही. म्हणून, ही प्रस्तावित ३ हजार ५५१ ठिकाणे अद्याप निश्चित झालेली नाहीत तसेच त्यामध्ये बदल होवू शकतो. (BMC Mumbai)
मुंबई महानगरपालिका (BMC Mumbai) आणि इतर शासकीय संस्था म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पोर्ट ट्रस्ट, रस्त्यालगतची (रोडसाईड) पार्किंग आणि खासगी गृहनिर्माण संस्थांमध्ये पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या जागा अशी सर्वच माहिती एकाच सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध होणार असल्याने ही खूप मोठी बाब ठरणार आहे. सॉफ्टवेअर इंटरफेसमुळे या सर्व पार्किंगच्या सुविधेशी संबंधित बाबी एकत्रित करणे शक्य होईल.
“या सुविधेमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचे एकूणच चित्र पालटणार आहे. मुंबईकरांना २४ तास पार्किंगशी संबंधित माहिती मोबाईल व इतर गॅजेटमध्ये उपलब्ध होवून पाहणे शक्य होणार आहे. परदेशात ज्या पद्धतीने एखाद्या ठिकाणी पोहचण्याआधीच आपला स्लॉट बुक करता येतो, रक्कम अदा करता येते, त्याच धर्तीवर अगदी सहज ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय ही सुविधा मुंबईकरांना सुलभरित्या वापरासाठी उपलब्ध होतील.” – पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), मुंबई महानगरपालिका (BMC Mumbai)
Join Our WhatsApp Community