Army Helicopter Crash: जम्मू-काश्मीर येथे भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

घटनेची माहिती समजताच तातडीने बचावकार्य सुरु झाले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये तीन अधिकारी होते.

240
Army Helicopter Crash: जम्मू-काश्मीर येथे भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

हाती आलेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीर येथील किश्तवाड जिल्ह्यात भारतीय लष्कराचं एक हेलिकॉप्टर कोसळलं (Army Helicopter Crash) आहे. हे हेलिकॉप्टर किश्तवाड येथील चिनाब नदीत पडले आहे. घटनेची माहिती समजताच तातडीने बचावकार्य सुरु झाले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये तीन अधिकारी होते. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, नदीत हेलिकॉप्टर कोसळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हा अपघात खराब हवामानामुळे झाल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – Operation Kaveri : सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील ३४ नागरिक मायदेशी परतले)

किश्तवाड येथे गेल्या तीन चार दिवसांपासून पाऊस सुरु होता. त्यामुळे तेथील वातावरण ढगाळ होऊन खराब झाले होते. अशातच तीन अधिकारी हेलिकॉप्टर मधून प्रवास करत असतांना हेलिकॉप्टर (Army Helicopter Crash) कोसळले.

हेही पहा – 

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर (Army Helicopter Crash) चिनाब नदीत पडले. या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि एक कमांडिंग अधिकारी होता. या दुर्घटनेत कमांडिंग अधिकारी सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र एक पायलट जखमी झाला असून दुसऱ्या पायलट बद्दल अजून काही समजू शकलेले नाही. जखमी पायलटवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.