Unseasonal Rain : संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्याच्या टेबलावर फेकले सडलेले कांदे

संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवार ४ मे रोजी जाब विचारण्यासाठी थेट भुसावळ तालुका कृषी कार्यालय गाठले.

232
Unseasonal Rain : संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्याच्या टेबलावर फेकले सडलेले कांदे

एप्रिल महिन्यात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली होती. त्याचा शेती पिकांवर मोठा परिणाम झाला. अशातच आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आणखी काही दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे संकट राहणार आहे. एकीकडे मे महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भात नद्यांना पूर आला आहे. तर दुसरीकडे नांदेड येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

(हेही वाचा – Unseasonal rain : सततच्या अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’)

अशातच जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे (Unseasonal rain) नुकसान झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून तिथे सतत गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे.

मात्र सरकारकडून याचे पंचनामे झालेले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी (Unseasonal rain) गुरुवार ४ मे रोजी जाब विचारण्यासाठी थेट भुसावळ तालुका कृषी कार्यालय गाठले. मात्र त्यावेळी कार्यालयात एकही अधिकारी नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्याने, कृषी अधिकाऱ्याच्या टेबलावर नोटा आणि सडलेले कांदे फेकत आपला संताप व्यक्त केला. कृषी सहाय्यकाकडून कोऱ्या कागदावर सह्या घेऊन अंदाजे पंचनामे केल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या सुरूच राहील, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

हेही पहा

भुसावळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सर्व शेतकरी जमा झाले. त्या ठिकाणी त्यांना कृषी अधिकारी न भेटल्याने संतप्त (Unseasonal rain) शेतकऱ्यांनी त्यांच्या टेबलवर सडके कांदे फेकून तीव्र निषेध केला. एकीकडे व्यापारी माल घ्यायला तयार नाही ? मग या कांद्याचे करणार काय? जागेवर कृषी अधिकारी नाही पंचनामाची प्रत मिळत नाही, त्यामुळे या अधिकाऱ्यांनाही कांद्याचे आम्ही भेट देत आहोत, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.