मंगळवार २ मे २०२३ रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अचानक आपल्या निवृत्तीची (Sharad Pawar Resigns) घोषणा केली. ही गोष्ट खूप अनपेक्षित असल्याने संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळातून या निर्णयाचे पडसाद उठतांना दिसत आहेत.
शरद पवार (Sharad Pawar Resigns) यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा यासाठी अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. काही कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे, तर काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहून राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. अशातच या सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी स्वतः शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर आले. त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मी तुमच्या भावनांचा आदर करतो असे सांगत; येत्या १-२ दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहिती दिली.
( हेही वाचा – Sharad Pawar Resigns: शरद पवारांच्या निवृत्तीला कोणाचा विरोध आणि कोणाचे समर्थन)
काय म्हणाले शरद पवार?
“मी निवृत्तीचा निर्णय घेतल्यापासून (Sharad Pawar Resigns) देशभरातून मला अनेक फोन आले. मी जर तुम्हाला (कार्यकर्त्यांना) सांगून हा निर्णय घेतला असता तर तुम्ही मला तो घेऊ दिला नसता. मी घेतलेला निर्णय हा योग्य आहे. आता नवीन नेतृत्व देशासमोर यायला पाहिजे ही माझी इच्छा आहे. मी पक्षाच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मात्र तरीही मी तुम्हा सर्वांच्या मतांचा आदर करतो. येत्या १-२ दिवसांत मी अंतिम निर्णय घेईन.” अशा शब्दांत शरद पवार यांनी कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधत त्यांची मनधरणी केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community