सुट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्ये रेल्वे (Central Railway) लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविम दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेने याआधीच ९१६ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली होती, मात्र यामध्ये आता २६ गाड्यांची भर पडल्याने या वर्षी उन्हाळी स्पेशलची संख्या एकूण ९४२ इतकी झाली आहे.
(हेही वाचा – Dhule-Dadar Express : धुळे-दादर एक्स्प्रेसला केंद्रीय रेल्वेमंत्री दानवे यांनी दाखवला हिरवा झेंडा)
या २६ विशेष गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे :
01129 विशेष दि. ६ मे २०२३ ते ३ जून २०२३ पर्यंत दर शनिवार, सोमवार आणि बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२.१५ म्हणजे सव्वादहा वाजता सुटेल आणि थिविम येथे दुसऱ्या दिवशी ११.३० वाजता पोहोचेल. (Central Railway)
01130 विशेष दि. ७ मे २०२३ ते ४ जून २०२३ पर्यंत दर रविवार, मंगळवार आणि गुरुवारी थिविम येथून १६.४० ( ४ वाजून ४०) वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.०५ वाजता पोहोचेल. (Central Railway)
हेही पहा –
थांबे :
ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड. (Central Railway)
संरचना:
एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय, १० शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी. (Central Railway)
आरक्षण:
विशेष गाडी क्रमांक 01129/01130 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ४ मे २०२३ रोजी सर्व ऑनलाईन आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सूरु होईल. (Central Railway)
तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. (Central Railway)
Join Our WhatsApp Community