भारतीय नौदलाचे व्हाइस चीफ ऑफ नेव्हल स्टाफ व्हाइस ऍडमिरल एस.एन. घोरमडे यांच्या हस्ते कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि उद्योगपती प्रशांत कारुळकर यांना नुकतेच प्रशंसा पदक प्रदान करण्यात आले. भोपाळ येथे तिन्ही सेना दलांच्या कमांडर्सच्या संयुक्त परिषदेसाठी व्हाइल ऍडमिरल घोरमडे आले होते. त्याआधी त्यांच्या हस्ते हे पदक कारुळकर यांना प्रदान करण्यात आले.
शं नो वरुणः
Honoured and spellbound to receive Indian Navy Commendation Medal Citation, a biggest appreciation from Vice Chief of Naval Staff (VCNS), Vice Admiral S. N. Ghormade PVSM, AVSM, NM, ADC at Bhopal yesterday. VCNS appreciated our work for society. I was in tears as this… pic.twitter.com/IZXll3pAqh— Prashant Karulkar (@prash2011) March 31, 2023
सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल हे पदक प्रदान करण्यात आले. सेकंड इन कमांडचे अधिकारी घोरमडे यांच्याकडून हे पदक मिळाल्यामुळे आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना प्रशांत कारुळकर यांनी व्यक्त केली. एका सर्वसामान्य नागरिकाच्या कामाची अशा पद्धतीने दखल घेतल्यामुळे आपल्याला नवा हुरूप आल्याचेही कारुळकर म्हणाले. कारुळकर यांनी यासंदर्भात ट्विट करत म्हटले आहे की, नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांत दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी आणि गेली ४० वर्षे देशसेवा करणाऱ्या व्हाइस ऍडमिरल घोरमडे यांच्याकडून हा सन्मान प्राप्त झाल्यामुळे माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
कारुळकर प्रतिष्ठान गेली ५४ वर्षे समाजसेवेच्या क्षेत्रात काम करत आहे. पालघरमध्ये कोरोनाच्या काळात साधू हत्याकांडात प्राण गमावणारे वाहनचालक निलेश तेलगडे यांच्या परिवाराला कारुळकर प्रतिष्ठानने सहाय्य केले होते. कोविड काळात प्रतिष्ठानने पुढाकार घेत सर्व थरातल्या लोकांना मदत केली. अन्नपदार्थ, औषधे यांचे मोफत वाटप केले. या कार्याबद्दल त्यांना लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले तर साऊथ आशियाई चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीकडूनही कौतुक करण्यात आले. इंडो युके कल्चरल फोरमतर्फेही त्यांना गौरविण्यात आले.
Join Our WhatsApp Community