बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण आणि उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस गौतम बुद्धांची जयंती आणि त्यांचा निर्वाण दिवस देखील आहे. भगवान बुद्धांना या दिवशी ज्ञानप्राप्ती झाली. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. (Eknath Shinde)
माणसाने जीवन जगण्याचा अर्थ सांगणारे बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…
बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…#बुद्धपौर्णिमा #भगवान #गौतम_बुद्ध pic.twitter.com/ymDPWCECc5
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 5, 2023
(हेही वाचा – Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे अचानक राज्यपाल रमेश बैस यांना भेटले; चर्चांना उधाण)
याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्व नागरिकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा मानव, प्राणिमात्रांच्या कल्याण आणि शांतीचा मार्ग त्रिकालाबाधित आणि चिरकाल अनुसरणीय राहील अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी तथागत बुद्धांच्या चरणी अभिवादन अर्पण केले आहेत.
हेही पहा –
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) म्हटले आहे की, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विश्वशांतीचा, सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाचा संदेश हा अनंतकाळ टिकणारा, त्रिकालाबाधित – चिरकाल असा आहे. त्यांनी दिलेल्या पंचशील तत्वांचा अंगीकार हा सगळ्यांच्याच उत्थानाचा मार्ग आहे. तथागतांचा आज जन्मोत्सव आणि ज्ञानप्राप्तीचा दिन. या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी प्रणाम. या बुध्द पौर्णिमेच्या पवित्र आणि मंगल अशा क्षणाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.
Join Our WhatsApp Community