कोणत्याही गोष्टीत ब्रँड म्हणजे प्रतिष्ठा ही मानसिकता बदलली पाहिजे, ब्रँडेड औषधे आणि महागडी औषधेच आजार बरे करू शकतात, असे नाही. तर स्वस्त औषधे देखील चांगले असतात, म्हणूनच जेनरिक औषधांसंदर्भात (Generic Medicine) जनजागृती करणे गरजेचे आहे, अगदी अमेरिका, कॅनडासारख्या देशात ९० ते ७५ टक्के औषधे ही जेनेरिक असतात, भारतात देखील अशा प्रकारचा कायदा झालेला आहे, आता यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, त्यामुळे रुग्णांचा पैसा वाचले, असे प्रतिपादन जेनेरिक औषंधांमधील तज्ज्ञ सचिन बिरारी यांनी केले.
वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षानिमित्त स्व. डॉ. वसंतराव पवार स्मृती व्याख्यानात सचिन बिरारी यांनी ‘ जेनेरिक औषध (Generic Medicine) नाण्याची दुसरी बाजू ‘ या विषयावर चौथे पुष्प गुंफले.
(हेही वाचा – Care Of Liver: ‘अशी’ घ्या लिव्हरची काळजी)
याप्रसंगी सचिन बिरारी म्हणाले की, जेनेरिक औषधांमध्ये (Generic Medicine) ब्रँडेड औषधांसारखेच असते. जेव्हा ब्रँडेड औषधांची पेंटट म्हणजे मात्रा मिसळण्याची आणि उत्पादनाची मक्तेदारी संपते, तेव्हा समान सूत्रे आणि क्षार वापरून जेनेरिक औषधे तयार केली जातात. परिणामी, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंगचा अपवाद वगळता जेनेरिक फार्मास्युटिकल्स त्यांच्या ब्रँड-नावाच्या समतुल्य असतात. त्याचे ब्रँडिंग, पॅकेजिंग, चव आणि रंग हे जेनेरिक आणि ब्रँड नेम औषधांमधील मुख्य फरक आहेत. त्यांच्या विपणन धोरणांमध्ये देखील फरक आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या उपचारांच्या किंमती मोठ्या प्रमाणात बदलतात. जेनेरिक औषधांच्या किंमती कमी असतात. जेनेरिक औषधांची खऱ्या अर्थाने आवश्यकता असल्यास, रुग्णाला बजेट आणि आरोग्य या दोन्ही दृष्टीने त्याचा फायदा होईल, त्यामुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार जेनेरिक औषधाचा प्रचार करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
हेही पहा –
जेनेरिक औषधांमध्ये (Generic Medicine) त्यांच्या ब्रँड-नावाच्या समकक्षांसारखेच धोके आणि फायदे आहेत. जेनेरिक औषधे सर्व सुरक्षा आणि गुणवत्ता आवश्यकता पूर्ण करतात याची पडताळणी करण्यासाठी सखोल तपासणीनंतरच त्यांना मान्यता दिली जाते, असं त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community