The kerala Story : विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्याला केरळ उच्च न्यायालयाने फटकारले; म्हणाले… 

काही काळापूर्वी येथे एक चित्रपट आला होता ज्यामध्ये पुजारी मूर्तीवर थुंकतात, पण तरीही येथील वातावरण बिघडले नाही. एका चित्रपटात हिंदू साधूंना तस्कर म्हणून दाखवण्यात आले होते, परंतु तरीही परिस्थिती बिघडलेली नाही, असे न्यायालय म्हटले.

337
चित्रपटाला भारतात विरोध; परदेशात मात्र समर्थन
चित्रपटाला भारतात विरोध; परदेशात मात्र समर्थन

‘द केरळ स्टोरी’ The kerala Story चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर केरळ उच्च न्यायालयात शुक्रवारी, ५ मे रोजी सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयात चित्रपटाचा टिझर दाखवण्यात आला. तो पाहून न्यायालायने उलट याचिकाकर्त्यालाच फैलावर घेतले. या चित्रपटात मुस्लिम धर्मावर टीका केली नसून इसिस या दहशतवादी संघटनेवर टीका केली आहे.

त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या बाजूने युक्तिवाद करताना वकील दुष्यंत दवे यांना  न्यायालयाने विचारले की, या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सामाजिक वातावरण बिघडू शकते असे काही आहे का? आम्हाला सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नाही आणि तसेच या चित्रपटाला संबंधित विभागाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार The kerala Story हा चित्रपट कोणत्याही ऐतिहासिक घटनेवर नसून एका कथेवर आहे. त्यावर वकील दुष्यंत दवे म्हणाले की, यामुळे समाजातील वातावरण बिघडू शकते, त्यामुळे आयपीसीच्या कलम 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूर्तीवर पुजारी थुंकतात या चित्रपटामुळे वातावरण बिघडले नव्हते

या प्रकरणी केरळ हे राज्य इतर राज्यांपेक्षा वेगळे आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. काही काळापूर्वी येथे एक चित्रपट आला होता ज्यामध्ये पुजारी मूर्तीवर थुंकतात, पण तरीही येथील वातावरण बिघडले नाही. एका चित्रपटात हिंदू साधूंना तस्कर म्हणून दाखवण्यात आले होते, परंतु तरीही परिस्थिती बिघडलेली नाही. The kerala Story या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रदर्शित झालेला नाही, ट्रेलर नोव्हेंबर महिन्यात रिलीज झाला होता, पण आता चित्रपट रिलीज होत असताना तुम्ही न्यायालयात येत आहात. त्यावर वकील दवे म्हणाले की, यापूर्वी एक-दोन चित्रपटांना अशी परवानगी मिळाली असेल, तर ती प्रत्येक चित्रपटाला द्यावी, असा अर्थ होत नाही. त्यावर न्यायालयाने प्रश्न विचारला, त्यामुळे चित्रपटाचा निषेध केला की गौरव केला गेला.

(हेही वाचा The Kerala story : सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार; बंदीची मागणी फेटाळली)

जगात एकच शक्ती आहे, जिची आपण पूजा करतो, असे म्हणता येईल का?

न्यायालयाने या चित्रपटाचा ट्रेलर आणि चित्रपट एकदा पाहावा आणि त्यानंतरच निर्णय घ्यावा, असे वकील दुष्यंत दवे यांना सांगितले. त्यावर वकील दवे म्हणाले, सुरुवातीला लोक म्हणू लागले की अशा ३२ हजार मुली आहेत, पण नंतर तीनच असल्याचे सांगितले जात आहे. न्यायालयाने म्हटले की, The kerala Story या चित्रपटात इस्लामच्या विरोधात काय आहे हे आम्हाला समजत नाही, कारण आमच्या माहितीनुसार हा चित्रपट इसिसच्या विरोधात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर उच्च न्यायालयात दाखवण्यात आला. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर न्यायालयाने विचारले की, हे सर्व इस्लामच्या विरोधात नसून ते ISIS बद्दल बोलले गेले आहे. हा एक काल्पनिक कथेवर आधारित चित्रपट आहे ज्यामध्ये काही लोक चुकीच्या गोष्टी करताना दाखवले गेले आहेत. चित्रपटात काही लोक फक्त टोपी घालून येत असतील तर त्यांना धर्मगुरू मानता येईल का? याचिकाकर्त्यावर टिप्पणी करताना न्यायालयाने विचारले की, या चित्रपटाच्या टीझर ट्रेलरमध्ये अन्य धर्म कुठे चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे? याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले की, माझा धर्म आणि देव चांगला आहे आणि तुमचा नाही, असे म्हटले तर ते मान्य करता येईल का? त्यावर न्यायालयाने जगात एकच शक्ती आहे, जिची आपण पूजा करतो, असे म्हणता येईल का, असा उलटा सवाल केला. याचिकाकर्त्यांच्या वकिलाने सांगितले की, असे दाखविल्यास इतर धर्माचे पालक आपल्या मुलांना मुस्लिम मुले राहत असलेल्या कॉलेजच्या वसतिगृहात पाठवणार नाहीत. न्यायालयाने म्हटले की, या चित्रपटात मुस्लिम समाजावर नाही, तर केवळ इसिसवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.