लव्हग्रोव्हमधील शुद्ध सांडपाणी वेलींग्टन स्पोर्टस क्लबला; १२ वर्षानंतर केवळ आठ रुपयांनी वाढ

255
लव्हग्रोव्हमधील शुद्ध सांडपाणी वेलींग्टन स्पोर्टस क्लबला; १२ वर्षानंतर केवळ आठ रुपयांनी वाढ
लव्हग्रोव्हमधील शुद्ध सांडपाणी वेलींग्टन स्पोर्टस क्लबला; १२ वर्षानंतर केवळ आठ रुपयांनी वाढ

विशेष प्रतिनिधी, मुंबई

लव्हग्रोव्ह सांडपाणी प्रक्रिया सुविधा केंद्रातून निर्माण होणारे पाणी आता वेलींग्टन स्पोर्टस क्लबला देण्यात येत आहे. मलप्रवाहावर प्रक्रिया केल्यानंतर प्राप्त झालेले पाणी प्रती १,००० लिटर साठी १८ रुपये तसेच अधिक ०२ रुपये जलवाहिनी अधिभार या दराने विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शुद्धीकरण प्रकल्पातून १५ लाख लिटर पाणी मिळत असून त्यातील १० लाख लिटर पाण्याची विक्री वेलींग्टन स्पोर्टस क्लबला केली जात आहे. मागील १२ वर्षांपासून या क्लबला प्रति १० हजार लिटरसाठी १० रुपये दर आकारला जात होता. अखेर १२ वर्षांनी हा दर वाढवण्यात आला आहे, मात्र हा दर वाढवताना पुढील तीन वर्षांकरता हा दर कायम राहणार आहे.

लव्हग्रोव्ह सांडपाणी पंपिंग स्टेशन मधून दररोज सुमारे ४०० दशलक्ष मलप्रवाह समुद्रात सोडला जातो. सध्या या पंपिंग स्टेशन मधील मलप्रवाहातून फक्त कचरा व रेती वेगळे करण्यात येते व मरीन आऊटफॉल व्दारे या मलप्रवाह समुद्रात सुमारे ३.५ कि.मि. अंतरावर सोडला जातो. मलप्रवाहाचे शुध्दीकरण केले जात असले तरी परंतु ही व्यवस्था महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने मलप्रवाह निष्कासनासाठी निश्चित केलेल्या मानकांची पूर्तता करणारी नाही. त्यामुळे पंपिंग स्टेशनच्या जागेतच परीपूर्ण मलप्रवाह प्रक्रिया व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याने आहे. एम. एस. डी. पी. २ प्रकल्पाअंतर्गत लव्हग्रोव्ह येथे मलप्रवाह शुध्दीकरण प्रक्रिया केंद्र बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यानच्या काळात २००६ साली लव्हग्रोव्ह सांडपाणी प्रक्रिया सुविधा केंद्रात सॉईल बायो टेक्नॉलॉजी (एस.बी.टी.) या अपारंपारिक तंत्रावर आधारीत प्रतिदिन सुमारे १५ लाख लिटर मलप्रवाह शुध्दीकरणाची क्षमता असलेला प्लांट प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आला. यामध्ये सध्या सुमारे प्रतिदिन १२ ते १५ लाख लिटर मलजल शुध्दीकरण करण्यात येते. आय. आय. टी. मुंबई यांनी एस.बी.टी. तंत्राचा शोध लावला असून स्थानिक पातळीवर पडताळणी करण्याच्या उद्देशाने या पथदर्शी (प्रयोगिक तत्वावर)प्लांट उभारण्यात आला. एस. बी. टी. प्लॅटने शुध्दीकरण केलेल्या मलप्रवाहाचा दर्जा उत्तम असून ते पाणी बागकाम आदी पिण्या व्यतिरिक्त इतर वापरांसाठी सोयिस्कर असल्याचे आढळून आले.

(हेही वाचा – Maharashtra Politics : येत्या पंधरवड्यात राज्यात राजकीय भूकंप)

लव्हग्रोव्ह संकुलातील झाडे, बागा यांसाठी दररोज सुमारे २ ते ३ लाख लिटर पाणी लागते. पूर्वी त्यासाठी शुध्दीकरण केलेले पाणी वापरण्यात येत होते. परंतु एस. बी. टी. प्लॅट ने मलप्रवाह शुध्द केल्यानंतर यामध्ये प्राप्त झालेले पाणी वापरण्यात येत आहे. लव्हग्रोव्ह संकुलाच्या शेजारी असलेल्या वेलींग्टन स्पोर्टस क्लब यांना बाग सिंचन व इतर पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी भरपूर पाणी लागते. त्याची दररोजची यासाठीच्या पाण्याची गरज प्रत्येकी सुमारे १० लाख लिटर एवढी आहे. महापालिकेने लव्हग्रोव्ह संकुलात मलप्रवाह शुध्दीकरणाचा एस. बी. टी. प्लँट उभारल्याचे समजल्यानंतर त्यांनी या प्लांटमधील पाणी इतर उपयोगांसाठी वापरण्याचे ठरविले आहे.

महापालिकेकडून एस.बी. टी प्लॅटने शुद्धीकरण केलेले पाणी क्लब विकत घेतात आणि पिण्या व्यतिरिक्त इतर वापरासाठी वापरतात, यासाठी सन २०१०ला महापालिका मंजुरी नुसार १२ रुपये- प्रती १००० लिटर या दराने त्यांना एस.बी.टी मध्ये शुध्दीकरण केलेले पाणी पुढील तीन वर्षासाठी विकण्याचा निर्णय घेतला होता. वेलींग्टन स्पोर्टस क्लब ह्या दराने मलप्रवाह शुध्दीकरण केल्यानंतर प्राप्त झालेले पाणी विकत घेण्यास तयार होते. त्याचप्रमाणे हे पाणी पुरविण्यासाठी लव्हग्रोव्ह संकुल ते वेलीग्टन स्पोर्टस क्लब पर्यंत आवश्यक ती जलवाहिनी महापालिकेने टाकली व त्यास येणास खर्च वसूल करण्यासाठी प्रती १००० लिटर पाण्यास २ रुपये अधिभार लावण्यात आला होता. अशाप्रकार एस. बी. टी प्लॅटने मलप्रवाह शुध्दीकरण केल्यानंतर प्राप्त झालेल्या पाण्याचा विक्रीसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर विक्री करण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला होता. या मंजुरीप्रमाणे एस.बी.टी मध्ये शुध्दीकरण केलेल्या पाण्याचा दर बदलण्याचे ठरविण्यात आले होते.

एम. एस. डी. पी. १२ प्रकल्पा अंतर्गत लव्हग्रोव्ह येथे मलप्रवाह शुध्दीकरण प्रक्रिया केंद्राचे काम हाती घेतले. हे मलजल प्रक्रिया केंद्राची व्यवस्था उभारण्यास सुमारे १ वर्षानंतर सुरवात होण्याची शक्यता आहे. त्यावेळी हा एस.बी. टी. प्लांट काढून टाकण्यात येणार आहे. परंतु ही प्रक्रीया व्यवस्था उभारल्यानंतर सध्याच्या व्यवस्थेने शुद्ध केलेल्या मलप्रवाहापासून प्राप्त झालेले पाणी उपलब्ध असेल. वेलींग्टन स्पोर्टस क्लब यांनी ते पाणी वापरण्याची तयारी दर्शविलेली आहे. त्याचप्रमाणे एस. बी. टी. प्लांट काढून टाकल्यापासून ते नविन प्रक्रिया व्यवस्था उभारुन कार्यान्वित होईपर्यंत काळात ते शुध्दीकरण न केलेले मलजल वापरण्यास तयार आहेत. त्यानुसार आता प्रती १,००० लिटरसाठी १८ रुपये अधिक ०२ रुपये जलवाहिनी अधिभार या दराने विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रती १,००० लिटरसाठी २० रुपये आकार हा ३ वर्षांच्या कालावधींसाठी कायम ठेवण्यात येईल. या तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर पुढील दोन वर्षाकरीता मलप्रवाहावर प्रक्रिया केल्यानंतर प्राप्त झालेल्या पाण्याच्या विक्रीच्या दराची पुनर्निश्चिती करण्यात येईल असे या खात्याने स्पष्ट केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.