राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार Sharad Pawar यांनी अध्यक्षपदापासून राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली मात्र दोन दिवसांत शरद पवारांनी हा निर्णय मागे घेतला. पवारांच्या या गुगलीमुळे पक्षात होणाऱ्या बंडखोरीला लगाम घातला. यावर बोलताना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी त्यांची अशी काही खेळी असेल याबद्दल मला कल्पना नाही, मी पवारांची लवकरच भेट घेणार आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली पण आज राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीने पवारांचा राजीनामा फेटाळला आहे. या निर्णयाबद्दल संजय राऊत यांनी समाधान व्यक्त केले. शरद पवार यांचा राजीनामा हा ठरवून केलेला आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता संजय राऊत म्हणाले की, ‘मला काही माहिती नाही, मी लवकरच शरद पवार यांना भेटणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. ‘मुळात त्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीने जर प्रस्ताव फेटाळला असेल तर माझे मत योग्य आहे. तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय असला तरी याचा विरोधी पक्षाच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो. आम्ही सगळे एकत्र असलो तरी देशातील प्रमुख पक्षांचे या घडामोडीकडे लक्ष आहे, असेही पवार म्हणाले. आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत जशा विरोधी पक्षांनी आपल्या भावना पवारांना कळविल्या तशाच उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या भावना शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत, असेही राऊत म्हणाले.
(हेही वाचा Sharad Pawar Resigns: राष्ट्रवादीची ‘पॉवर’ कोणाच्या हातात? लवकरच निर्णय होण्याची शक्यता)
Join Our WhatsApp Community