अनेक महिन्यांपासून रखडलेल्या ‘एसीपी’ प्रमोशनामुळे राज्यातील ज्येष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यात नाराजीचे सूर उमटत आहे. अनेक अधिकारी तर प्रमोशनची वाट बघून पोलीस निरीक्षक पदावरच सेवानिवृत्त झाले असून अनेक जण निवृत्तीच्या वाटेवर आहेत. आयपीएस अधिकारी यांच्या पदोन्नती आणि बदल्या वेळच्या वेळी होत असतात, मात्र राज्य पोलीस दलातील पोलिसांच्या पदोन्नतीसाठी गृहविभागाला मुहूर्त मिळणार आहे का नाही? असा प्रश्न अधिकारी यांच्याकडून विचारला जात आहे.
राज्यातील पोलीस दलातील १३५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या पदोन्नतीची यादी मागील सात ते आठ महिन्यांपूर्वीच पोलीस महासंचालक कार्यालयातून गृहमंत्रालयात पाठविण्यात आली आहे. मात्र अद्यापही पदोन्नती ही फाईल लालफितीत अडकून पडली आहे.
(हेही वाचा – Maharashtra Politics : येत्या पंधरवड्यात राज्यात राजकीय भूकंप)
एसीपीच्या पदोन्नतीच्या यादीत मुंबईतील जवळपास ४० अधिकारी यांचे नावे असून त्यातील मागील दोन महिन्यात ५ ते ६ अधिकारी पदोन्नती विनाच निवृत्त झाले आहे. तर अनेक अधिकारी निवृत्तीच्या वाटेवर आहेत. मागील दोन महिन्यात मुंबईसह राज्यातील आयपीएस आधिकारी यांना वेळेवर पदोन्नती देण्यात आलेली असून बदल्या देखील वेळेवर होत आहेत. राज्यातील पोलिसांचे बढत्या का रखडल्या जात आहे असा प्रश्न निवृत्तीच्या वाटेवर असणारे आधिकारी विचारत आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे एसीपी (सहाय्यक पोलीस आयुक्त) पदावरील बढत्या रखडल्यामुळे इतर पोलीस अधिकारी यांच्या बदल्या थांबल्या आहेत. जोपर्यंत एसीपी प्रमोशन येत नाही, तोपर्यंत ती जागा रिकामी होत नसल्यामुळे इतर अधिकारी यांच्या बदल्या थांबलेल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community