Karnataka Assembly Elections : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून तब्बल ८८ लाखांची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश

पोलिसांनी या संदर्भात त्याला पुरावा मागितला असता त्याने कोणताही पुरावा पोलिसांना दाखवला नाही.

217
Karnataka Assembly Elections : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून तब्बल ८८ लाखांची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश

येत्या १० मे रोजी कर्नाटकात विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Elections) होत आहे. अशातच महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर तब्बल ८८ लाख रुपये रोकड असलेल्या गाडीला पोलिसांनी ताबयात घेतले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अक्कलकोट तालुक्यातील तोळनूर गावातील चेक पोस्टवर शुक्रवार ५ मे रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Congress : कर्नाटकातील काँग्रेसने बजरंग दलाची केली पीएफआयशी तुलना)

निवणुकांच्या (Karnataka Assembly Elections) पार्श्वभूमीवर सीमेवर कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. सीमेवर पोलिसांनी चेक पोस्ट तयार केले आहेत. या चेक पोस्टवरुन कर्नाटकात जाणाऱ्या प्रत्येक गाड्यांची कसून तपासणी केली जात आहे. रात्री उशिरा एम. एच. १३ डीजे ७५४५ ही कार तोळनूर चेक पोस्टवर पोलिसांनी अडवली. गाडीची तपासणी केली असताना लोखंडी पेटीत ८८ लाख रुपयांची रोकड असल्याचे पोलिसांना आढळून आले.

हेही पहा

गाडी चालकाला (Karnataka Assembly Elections) या रकमेसंदर्भात विचारले असता त्याने एटीएममध्ये ही रक्कम भरण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी या संदर्भात त्याला पुरावा मागितला असता त्याने कोणताही पुरावा पोलिसांना दाखवला नाही. त्यामुळे पोलिसांनी गाडी आणि रोकड जप्त केली. त्यानंतर पोलिसांनी या सर्व प्रकारची आयकर विभागाला माहिती दिली. आता आयकर विभागाच्या चौकशीदरम्यान काही खुलासा झाला तर ही रक्कम पुन्हा दिली जाईल नाहीतर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.