गोव्यामधील बेनौलिम येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या (S Jaishankar) शिखर परिषदेसाठी पाकिस्तानचे मंत्री भारतात आले होते. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी गुरुवार ४ मे रोजी भारतात दाखल झाले. तब्बल १२ वर्षांनंतर पाकिस्तानी मंत्री भारतात दाखल झाले आहेत. (S Jaishankar)
(हेही वाचा – Operation Kaveri : ‘ऑपरेशन कावेरी’! सुदानमधून पहिली तुकडी भारतात दाखल)
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो झरदारी हे दहशतवाद उद्योगाचे प्रवर्तक, समर्थक आणि प्रवक्ते आहेत, असा आरोप भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी शुक्रवारी ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) परिषदेतील बैठकीनंतर केला.
No shake hand, only Namastey…, Jaishankar greets Pakistan minister Zardari at SCO meet in Goa
Read @ANI Story | https://t.co/G64RNIgYJb#India #Pakistan #BilawalBhuttoZardari #jaishankar #SCO #Goa #Namastey pic.twitter.com/GNraDUuBkY
— ANI Digital (@ani_digital) May 5, 2023
हेही पहा –
एससीओ बैठकीत बिलावल भुत्तो, यांनी भाषणात दहशतवादाला ‘‘राजनैतिक लाभाचे शस्त्र बनवले जाऊ नये’’ असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून जयशंकर यांनी भुत्तो यांच्यावर तीव्र टीका केली. (S Jaishankar)
काय म्हणाले एस. जयशंकर?
भुत्तो यांच्या, दहशतवादाचा शस्त्रासारखा वापर करण्याच्या विधानांतून त्यांची मानसिकता नकळतपणे प्रकट झाली आहे. दहशतवादपीडित दहशतवादाच्या प्रवक्त्यांशी चर्चा करू शकत नाही, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील, असा पुनरूच्चारही जयशंकर (S Jaishankar) यांनी केला. दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानची विश्वासार्हता त्याच्या परकीय गंगाजळीपेक्षाही वेगाने घसरत आहे.” असा टोलाही जयशंकर यांनी पाकिस्तानला लगावला. अशा पद्धतीने जयशंकर यांनी भुत्तो यांना खडेबोल सुनावले आहे.
Join Our WhatsApp Community