गेल्या वर्षभरात जगातील विख्यात टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी संख्येत कपात (Staff Reduction) केली आहे. गूगूल, अॅमेझॉन, मेटा, मायक्रोसॉफ्ट यासाख्या इतर कंपन्यांचा या यादीत समावेश आहे. कर्मचारी कपातीच्या सत्राच्या पार्श्वभूमीवर एका भारतीय कंपनीने कर्मचारी यांच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
(हेही वाचा – Staff Reduction: ‘या’ मोठ्या कंपनीने केली कर्मचारी कपात; कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार)
आर्थिक मंदी, वाढणारा खर्च, घटणारी मागणी अशा तऱ्हेची कारणे देत अनेक टेक कंपन्यांनी एकदा नव्हे तर दोनदा कर्मचारी कपात (Staff Reduction) केली आहे. २०२२ च्या आर्थिक वर्षात ३,२३२ चा महसूल मिळवणारी भारतीय कंपनी म्हणजे मीशो. या कंपनीने तब्बल १५% कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती कंपनीचे सीईओ विदित आत्रे यांनी दिली.
एका ई – मेलच्या माध्यामातून कर्मचाऱ्यांना (Staff Reduction) ही माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार कंपनीच्या एकूण कर्मचारी वर्गापैकी १५% कर्मचाऱ्यांना म्हणजेच २५१ नोकरदारांना काढून टाकण्यात आले आहे. या कपाती मागचे कारण विदित यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, कंपनीचा आर्थिक फायदा वाढवा या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. सतत फायदा मिळवण्यासाठी आम्हाला लहान संघटनात्मक संरचनांसोबत काम करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही पहा –
कपात केलेल्या कर्माचाऱ्यांना (Staff Reduction) कंपनीने वाऱ्यावर सोडलेले नाही. कंपनीतील पदानुसार किमान अडीज ते नऊ महिन्यांचा पगार प्रभावित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच त्यांना एक सेपरेशन पॅकेज देण्यात येणार आहे. या शिवाय नवीन नोकरी मिळवण्यासाठी साहाय्य देखील करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community