Zero Shadow : महाराष्ट्रात तुमची सावली तुम्हाला सोडून जाणार

महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे ३ मे रोजी तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो.

184
महाराष्ट्रात तुमची सावली तुम्हाला सोडून जाणार
महाराष्ट्रात तुमची सावली तुम्हाला सोडून जाणार

३ ते ३१ मे हे सर्व दिवस महाराष्ट्रात विविध शहरात शून्य सावली दिवस अनुभवायला मिळणार आहे. कारण या दिवसांत आपली वर्षभर सोबत राहणारी सावली काही मिनिटासाठी सोडून जाणार आहे. तो क्षण आणि दिवस केव्हा आणि कुठे घडतो हे जाणून घेणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 ° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शुन्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा. तसेच सूर्य दररोज 0.50 ° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो, त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते. भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदीरा पॉइंट येथे ६.७८° अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. पुढे १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्या कुमारी येथे शून्य सावली दिवस येतो तो दक्षिण भारतात तेलंगणा येथे २ मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो.

महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे ३ मे रोजी तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो. भारतातून शेवटी मध्य प्रदेशातील भोपाळ जवळून २३.५० ° अंशावरून कर्कवृत गेले आहे, त्यामुळे शून्य सावलीचा हा भारतातील शेवटचा भूभाग आहे.भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली,हिमाचल,काश्मीर कुठेही शून्य सावली घडत नाही. आता आपण महाराष्ट्रातील शून्य सावली दिवस पाहूया महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात १५.६° अक्षांश ते धुळे जिल्ह्यात २१.९८ ° अक्षांश ह्या दरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे. एका अक्षांसावर येणाऱ्या सर्व परिसरात त्याच दिवशी शुन्य सावली दिवस येतात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत, त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे, त्यामुळे आपण दुपारी १२.०० ते १२.३५ ह्या वेळा दरम्यान सूर्य निरीक्षण करावे. समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल.

(हेही वाचा Barsu Refinery :  महाराष्ट्र पेटवण्यापेक्षा लोकांच्या चुली पेटवा; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला )

३ मे – सावंतवाडी, शिरोडा मांगेली,खूषगेवाडी,आंबोली
४ मे – मालवण,आंबोली
५ मे – देवगड,राधानगरी, रायचूर
६ मे – कोल्हापूर, इचलकरंजी,
७ मे – रत्नागिरी, सांगली, मिरज
८ मे – कऱ्हाड, जयगड, अफजलपूर
९ मे – चिपळूण, अक्कलकोट
१० मे – सातारा, पंढरपूर, सोलापूर
११ मे – महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर, वाइ
१२ मे – बारामती, बार्शी, उस्मानाबाद
१३ मे – पुणे,मुळशी, दौड, लातूर,लवासा,असरल्ली
१४ मे – लोणावळा, अलिबाग, दाभाडे,पिंप्री-चिंचवड, देहू,जामखेड, आंबेजोगाई,
१५ मे – मुंबई, नवी मुंबई, कर्जत, बीड,माथेरान, राळेगण सिद्दी, सिरोंचा
१६ मे – बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर,नारायण गाव,खोडद,अहमदनगर, परभणी, नांदेड, निर्मल
१७ मे – नाला सोपारा, विरार,आसनगाव, अहेरी,आल्लापल्ली,
१८ मे – पालघर,कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा
१९ मे औरंगाबाद,डहाणू,नाशिक,कोपरगाव,वैजापूर, जालना, पुसद,बल्लारशा,चामोर्शी
२० मे – चंद्रपुर,मेहकर,वाशीम,वणी,मूल
२१ मे – मनमाड,चिखली, गडचिरोली,सिंदेवाही, रोहना,
२२ मे – मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, खोपोली, यवतमाळ, आरमोरी
२३ मे – खामगाव, अकोला , देसाईगंज, ब्रम्हपुरी,नागभीड
२४ मे – धुळे,जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड,दर्यापूर
२५ मे – जळगाव,भुसावळ, अमरावती,अंमळनेर,तेल्हारा
२६ मे – नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.