Sharad Pawar : शरद पवारांनी नेहमीप्रमाणे फिरवला शब्द; राधाकृष्ण विखे पाटलांची टीका

शरद पवार यांनी 2 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला.

172
शरद पवारांनी नेहमीप्रमाणे फिरवला शब्द
शरद पवारांनी नेहमीप्रमाणे फिरवला शब्द

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आणि या राजीनामा नाट्यावर पडदा पडला. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवृत्तीच्या प्रकरणावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनीही शरद पवारांवर टीका केली आहे. सवयीप्रमाणे शरद पवार यांनी आपला शब्द फिरवला असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

शरद पवार यांनी 2 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी लावून धरली. अखेर शुक्रवारी, 5 मे शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. यावर प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पवारांनी म्हटले होते की भाकरी फिरवली पाहिजे. मात्र त्यांनी आपल्या सवयीप्रमाणे निर्णय फिरवला आहे.

(हेही वाचा Karnataka Assembly Elections : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून तब्बल ८८ लाखांची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश)

उद्धव ठाकरेंची भूमिका नेहमीच बदलत असते

उद्धव ठाकरे हे बारसू इथल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना भेटण्यासाठी शनिवारी दौरा करत आहेत. याबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, नाणारच्या वेळी त्यांची वेगळी भूमिका होती, आता वेगळी भूमिका आहे. त्यांची भूमिका नेहमीच बदलत असते. मात्र स्थानिकांच्या काय भावना आहेत याबाबत सरकार त्यांच्याशी चर्चा करत आहे. बारसू प्रकरणाला विनाकारण राजकीय हवा देण्याचा प्रकार होत असल्याचा राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.