Child Marriage : नाशिक मध्ये एप्रिल महिन्यात रोखले १३ बालविवाह

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या कारवाईबद्दल सर्व सहभागी अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

181
Child Marriage
Child Marriage : नाशिक मध्ये एप्रिल महिन्यात रोखले १३ बालविवाह

महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या बालविवाह (Child Marriage) प्रतिबंधात्मक धडक मोहिमेअंतर्गत १ एप्रिल ते २ मे दरम्यान नाशिक जिल्ह्यात तब्बल १३ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांनी ही मोहीम राबवली.

(हेही वाचा – Child Marriage : राज्यात मागील तीन वर्षांत दोन हजार २८७ बालविवाह रोखण्यात यश)

महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात बालविवाह (Child Marriage) करू नये, बालविवाहाचे दुष्परिणाम, बालविवाह (Child Marriage) होणार असल्याचे कळाल्यास तक्रार कुठे करावी याबद्दल जनजागृती करण्यात आली होती. त्याचाच परिणाम म्हणून जिल्हा प्रशासनाकडे बालविवाहांसंदर्भात गोपनीय तक्रारी प्राप्त झाल्या, त्या अनुषंगाने कारवाई करत महिला व बालकल्याण विभागाने जिल्ह्यात १३ बालविवाह रोखले, यामध्ये नाशिक तालुक्यातील १, सिन्नर १, बागलाण २, त्र्यंबकेश्वर ७, इगतपुरी २ बालविवाह रोखण्यात आले आहेत.

हेही पहा – 

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या कारवाईबद्दल सर्व सहभागी अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बालविवाह (Child Marriage) होणार अथवा झालेले आढळल्यास प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात कुठेही बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यास १०९८ या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.