विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजप पक्षप्रवेश आणि शरद पवार यांच्या निवृत्तीची घोषणा या घटनांमुळे महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून तापलेलं आहे. अशातच भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) एक खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Raj Thackeray : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझी बदनामी केली – राज ठाकरे)
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लवकरच उद्धव ठाकरे यांना एकटं पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जातील असा दावा नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.
हेही पहा –
काय म्हणाले नितेश राणे?
“महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये आणखी एक भूकंप होणार आहे. संजय राऊत १० जून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, असा खळबळजनक दावा भाजप नेते आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर संजय राऊतला बसायचे होते. त्यासाठी ते सातत्याने शरद पवारांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे संजय राऊत सिल्व्हर ओकवर गेले. उद्धव ठाकरे सापाला दूध पाजत आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर यांचे मनसुबे कळतील.”
Join Our WhatsApp Community