राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी शुक्रवारी, ५ मे रोजी पक्ष अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला. या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित नव्हते. यासंदर्भात रविवारी, ७ मेला अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारताच ते चिडल्याचे पाहायला मिळाले.
(हेही वाचा – संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार, नितेश राणेंच्या या दाव्यावर काय म्हणाले शरद पवार?)
काय म्हणाले अजित पवार?
बारामतीत प्रसार माध्यमांसोबत बोलताना अजित पवारांनी शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित का नव्हते? याचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, ‘ए.. त्याच्याबद्दल शरद पवारांनी सांगितलंय. पुन्हा पुन्हा काय रे तेच, पत्रकार परिषदेत नव्हतो ते? तिथे छगन भुजबळ होते? अरे वेड्या २५ जण आम्ही त्या समितीमध्ये होतो. पवारसाहेबांना भेटायला गेल्यानंतर पवारसाहेब म्हटले की, आता त्यांचे सहकारी म्हणून प्रफूल्ल भाईंनी हजर राहावे. जयंत पाटील प्रांत अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी तिथे उपस्थित राहावे. नंतर आमचे केरळचे आमदार आले होते, त्यांनी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहावे. एक आमचे नॉर्थमधून आले होते. पी.सी चाको त्यांना ४ वाजताचे विमान होते, म्हणून ते निघून गेले. असे काही ठराविक लोकं तिथे हजर होते. सगळ्यांना पत्रकार परिषद घेताना चार-पाचच खुर्च्या असतात, त्याकरता साहेब म्हटले, बाकीचे तुम्ही येऊ नका.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community