पश्चिम डोंबिवलीत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढ होत असून नागरिकांना विरंगुळा म्हणून बगीचे, मैदाने आणि नेचर पार्क आदी गोष्टींची खूप आवश्यकता आहे. त्यामुळे दीपेश म्हात्रे यांच्या संकल्पनेतून खाडीकिनारी एक भव्य नेचर पार्क उभारण्यात येणार असून यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मोलाचे सहकार्याने मिळाले आहे. या नेचर पार्कचा भूमिपूजन सोहळा रविवारी, ७ मेला संपन्न झाला. लवकरात लवकर ही नेचर पार्क सर्व सुविधानाने सज्ज असेल आणि डोंबिवलीकर यांना नक्कीच आवडेल असा विश्वास माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केला.
(हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागणार कारण…; ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांचा दावा)
पश्चिम डोंबिवली शहराचा विचार केला तर शहरात मोजकिच मैदाने व बगीचे आहेत. भागशाळा मैदान, नेहरू मैदान आणि ठराविक बगीचे लक्षात घेता नागरिकांना विरंगुळ्यासाठी आणखी काही ठिकाणांची गरज आहे. सध्या खाडीकिनारी फेरफटका मारणे आणि बीचसारखा आनंद घेणे याकडे तरुण वर्गाचा ओढा जास्त असतो. शिवाय ज्येष्ठ नागरिकही खाडीकिनारी हवेशीर जागा म्हणून फेरफटका मारत असल्याचे दिसून येत असते. याचाच विचार करून आणि वस्तुस्थितीची पारख करून दिपेश म्हात्रे यांना मोठागाव खाडीलगत असलेला तलाव (Back Water) परिसर सुशोभीकरणासाठी योग्य असल्याचे लक्षात आले.
म्हात्रे यांनी याचा सविस्तर अभ्यास आणि आराखडा तयार करून तसेच डोंबिवलीकरांची मागणी म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे “नेचर पार्क” असा प्रस्ताव मांडला. शिंदे यांनी या विकासकामाला होकार देऊन मोठागाव खाडीलगत असलेल्या तलाव परिसराच्या सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून ६ कोटी रुपये मंजूरी मिळवून दिली. यामुळे मोठागाव डोंबिवलीत छान सुंदर, हवेशीर, नेचर पार्क या निमित्ताने होणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी दिपेश पुंडलीक म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे डोंबिवली ते ठाणे हे अंतर केवळ वीस मिनिटात गाठणार असलेल्या लांबलचक मानकोली उड्डाणपुलाच्या काही अंतरावर हे नेचर पार्क होणार असल्याने या पार्कला वेगळेपण निश्चित मिळणार आहे अशी चर्चाही यावेळी सुरू होती. दरम्यान यावेळी डोंबिवलीकरांनी म्हात्रे यांना शुभेच्छा देऊन एक चांगला प्रकल्प उभारल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community