पश्चिम द्रुतगती महामार्गावर सार्वजनिक शौचालय: महिला, पुरुषांसह तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था

279
पश्चिम द्रुतगती महामार्गावर सार्वजनिक शौचालय: महिला, पुरुषांसह तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था
पश्चिम द्रुतगती महामार्गावर सार्वजनिक शौचालय: महिला, पुरुषांसह तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गोरेगाव (पूर्व) परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विरवाणी इंडस्ट्रीयल इस्टेट जवळ विविध अद्ययावत सोयी सुविधांनीयुक्त सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्त्री, पुरुष तसेच तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा, महिलांसाठीच्या शौचालयात सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बाळांचे डायपर बदलण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाइल चार्जिंग स्टेशन आणि पेय पदार्थांसह ‘एटीएम’ची देखील सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे शौचालयाच्या छतावर ‘सोलर पॅनल’ बसविण्यात येणार असून त्यापासून उर्जा निर्मिती देखील करण्यात येणार आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांनुसार मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, उप आयुक्त (परिमंडळ ०४) विश्वास शंकरवार आणि उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात गोरेगाव (पूर्व) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर १ हजार ४५३ फूट एवढ्या प्रशस्त जागेमध्ये सर्व सोयींनीयुक्त सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘पी दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश आक्रे यांनी दिली आहे.

या शौचालयाची उभारणी ही गोरेगाव (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर होणार आहे. त्यामध्ये स्त्री, पुरुष तसेच तृतीय पंथीय यांच्यासाठी स्वतंत्र शौचालये, महिला शौचालयात सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बाळांचे डायपर बदलण्यासाठी समर्पित जागा अशा सुविधा असणार आहेत. याचबरोबर पिण्यासाठी शुद्ध पाणी, मोबाइल चार्जिंग स्टेशन, एटीएमची सुविधा देखील प्रस्तावित करण्यात आली असून या ठिकाणी चहा कॉफीसह पेय पानाची देखील व्यवस्था असणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह सभोवतालच्या जागेवरती रंगीत फुलांची झाडे लावण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – मध्य वैतरणा प्रकल्पग्रस्त अखेर मुंबई महापालिकेच्या सेवेत)

या प्रस्तावित शौचालयामध्ये पुरुषांसाठी ५ शौचकूप, महिलांसाठी ५ शौचकूप आणि दिव्यांगांसाठी १ शौचकूप असणार आहे.

सौर ऊर्जा निर्मिती होण्याच्या दृष्टीने या शौचालयाच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे. या सोलर पॅनलमधून २० किलोवॅट विजेची निर्मिती होणार आहे. अशाप्रकारे निर्माण होणारी वीज ही विद्युत पुरवठा कंपनीला देण्यात येणार असून विद्युत पुरवठा कंपनीच्या मासिक बिलातून ही रक्कम वजा केली जाणार आहे. त्यामुळे साहजिकच शौचालयाच्या मासिक खर्चात बचत होण्यासह पर्यावरण पूरकताही साधली जाणार आहे.

मुख्य रस्ते व द्रुतगती महामार्गावर शौचालयाची सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली, तर नागरिकांची गैरसोय होणार नाही. या उद्देशाने या सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत या शौचालयाची दैनंदिन स्वच्छता व देखरेख देखील करण्यात येणार आहे. कार्यादेश निघाल्यानंतर १२ महिन्यात या शौचालयाचे बांधकाम पूर्ण होईल, असेही सहाय्यक आयुक्त राजेश आक्रे यांनी कळविले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.