ठाकरे गटाच्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधण्यात आला आहे. ‘पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले,’ असा सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाकडून शरद पवारांवर आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवारांचे ‘लोक माझे सांगाती’ हे पुस्तक प्रकाशित झाले, या पुस्तकातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली होती. त्याचीच परतफेड सोमवारी, ८मेला सामन्याच्या अग्रलेखातून करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
नक्की सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने काय मत मांडले?
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच खळबळ माजणे साहजिकच होते. ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला आणि प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला.’
(हेही वाचा – Karnataka Elections 2023: काँग्रेसचा बदला पंतप्रधान मोदी नाहीतर कर्नाटकातील जनता घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
‘कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मनधरणी केली आणि लोकभावनेचा आदर राखून पवार यांनी राजीनामा मागे घेतला. यापुढे तेच राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळतील. त्यामुळे गेले चार-पाच दिवस सुरू असलेल्या नाट्यावर पडदा पडला आहे.’
‘पवार यांनी जे राजीनामा नाट्य केले ते ‘नौटंकी’ होते, अशी टीका भाजपाने केली. भाजपा हा एक पोटदुख्या पक्ष आहे. दुसऱ्यांचे चांगले व्हावे किंवा बरे घडावे असे त्यांना कधीच वाटत नाही. इतरांचे पक्ष किंवा घरे मोडून हा पक्ष उभा राहिला आहे. दुसरे असे की, इतरांवर ‘नौटंकी’ असा आरोप करण्यापूर्वी जगातील सगळ्यात मोठे नौटंकीबाज म्हणून ख्यातकीर्त पावलेल्या आपल्या पंतप्रधान मोदींकडे त्यांनी आधी पाहायला हवे. देशाच्या राजकारणाची ‘नौटंकी’ करणाऱ्यांना दुसऱ्यांच्या घडामोडी नौटंकीच वाटणार.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community