२४ एप्रिल २०१७ ला पहिल्यांदा तेजस एक्स्प्रेस धावली होती. तेव्हा ही सेमी-हाई स्पीड ट्रेन सीएसटी ते करमाळी स्थानका दरम्यान धावली होती. १८० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने ही ट्रेन धावते. या ट्रेनच्या तिकिट शुल्कात पेय, कॉल बटण, नाश्तासारख्या सुविधा अंतर्भूत आहेत. मात्र प्रवाशांच्या पसंतीला उतरलेल्या या एक्सप्रेसमध्ये मराठी भाषेचा अपमान होतो आहे.
मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. त्यातील एक सुविधा म्हणजे फलक. त्या फलकात येणारे स्थानक, गाडीचा वेग, अंतिम स्थानक या सारख्या गोष्टींची माहिती मिळते. त्या फलकावर ज्या मराठी सूचना झळकल्या होत्या, त्या वाचून प्रवासी संतप्त झाले आहेत.
(हेही वाचा – मुंबईत उभारणार आणखी पाच अग्निशमन केंद्रे)
काय आहेत सूचना?
तेजस एक्स्प्रेसमधील मराठीचा अपमान हे तर प्रकाशझोतात आलेले एक उदाहरण आहे. भारतीय रेल्वेचा कारभार पाहिला असता वेगवेगळ्या पातळ्यांवर मराठी भाषेची गळचेपी होत असल्याचे वारंवार समोर आले आहे.
“तुमचा प्रवास सुखाचा आणि सोयीचा हो ही भारतीय रेल्वेची शुभेच्छा”
“कृपया आपल्या जोडीदारावर लक्ष ठेवावे”
“तुमची आपली वस्तू एका बाजूला ठेवू नये”
या दिशाभूल करणाऱ्या आणि अशुद्ध भाषेत लिहिलेल्या सूचना वाचल्यावर रेल्वे प्रशासनाला नेमके काय सांगायचे आहे ते कळत नाही.
ठाणे स्थानकातल्या फलाट क्रमांक ५ आणि ६ वर सूचना देण्यासाठी एक फलक बसवण्यात आला आहे. फलाटावर येणाऱ्या गाड्यांची माहिती इथे मिळते. त्यात सुद्धा अशा तऱ्हेच्या अशुद्ध सूचना झळकतात.
आनंदा पाटील म्हणाले…
मराठी एकीकरण समितीचे आनंदा पाटील म्हणाले की, रेल्वे प्रशासनाने राज्यात मराठी भाषेची होणारी अवहेलना थांबवणे गरजेचे आहे. राज्यात रेल्वेच्या कारभारात शुद्ध मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच रेल्वेत झळकणाऱ्या सर्व सूचना मराठी अधिकाऱ्यांच्या नजरेखालून जाणे आवश्यक आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community