MiG 21 : आतापर्यंत ४०० हुन अधिक वेळा मिग – २१ विमान कोसळले 

०१९ मध्ये, तत्कालीन एअर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी भारतीय हवाई दलाच्या कालबाह्य लढाऊ विमाने आणि शस्त्रास्त्रांबद्दल बोलताना सांगितले की हवाई दल ४० वर्षांहून अधिक जुनी लढाऊ विमाने उडवत आहे. एवढी जुनी गाडीही कोणी चालवत नाही.

237
तापर्यंत ४०० हुन अधिक वेळा मिग - २१ विमान कोसळले 
तापर्यंत ४०० हुन अधिक वेळा मिग - २१ विमान कोसळले 

MiG 21 पुन्हा क्रॅश झाले आहे. हे हवाई दलाचे लढाऊ विमान सोमवारी, ८ मे २०२३ रोजी राजस्थानमधील हनुमानगड येथे कोसळले. बहलोल नगर भागातील एका घरावर विमान कोसळले. यामध्ये ३ महिलांचा मृत्यू झाला. पायलटने पॅराशूटने उडी मारून आपला जीव वाचवण्यात यश मिळवले.

(हेही वाचा Mumbai Airport : विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर; कारण… )

अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यासाठी लेखी आश्वासन हवे आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे MiG 21 विमान कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही. हे विमान ६०च्या दशकात हवाई दलात सामील झाले. १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात या जेटने महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण लष्कराच्या ताफ्यात सामील झाल्यापासून हे विमान ४०० हून अधिक वेळा कोसळले आहे. या अपघातांमध्ये २०० हून अधिक पायलट आणि सुमारे ६० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये, तत्कालीन एअर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी भारतीय हवाई दलाच्या कालबाह्य लढाऊ विमाने आणि शस्त्रास्त्रांबद्दल बोलताना सांगितले की हवाई दल ४० वर्षांहून अधिक जुनी लढाऊ विमाने उडवत आहे. एवढी जुनी गाडीही कोणी चालवत नाही.

(हेही वाचा The Kerala Story : चित्रपटातील कथानक माझ्याही आयुष्याशी जुळणारे, हिंदू धर्माबद्दल अज्ञानामुळे केले धर्मांतर; सांगतेय अनघा… )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.