cyclone : चक्रीवादळाचा इशारा; राज्यात कोणत्या जिल्ह्यांना बसणार फटका? 

विदर्भासह नजिकच्या शहरांमध्येही पावसाचा जोर पाहायला मिळेल. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि धान्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

240
चक्रीवादळाचा इशारा
चक्रीवादळाचा इशारा

राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आधीच बळीराजा चिंतेत असताना आता एका चक्रीवादळामुळे राज्याला मोठा धोका असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबात पट्टा तयार झाल्यामुळे सोमवारी, ८ मे रोजी मोचा चक्रीवादळ धडकणार आहे. याचा परिणाम महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर पाहायला मिळेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे

मोचा चक्रीवादळामुळे ३ महत्त्वाच्या राज्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला असून यामुळे पुढचे ४ दिवस मुसळधार पाऊस होईल, असा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा परिणाम राज्यातही पाहायला मिळणार आहे. यावेळी हवामानात मोठा बदल होऊन पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार आणि काही शहरांमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भासह नजिकच्या शहरांमध्येही पावसाचा जोर पाहायला मिळेल. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि धान्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा The Kerala Story : चित्रपटातील कथानक माझ्याही आयुष्याशी जुळणारे, हिंदू धर्माबद्दल अज्ञानामुळे केले धर्मांतर; सांगतेय अनघा… )

दरम्यान, बंगालमधील चक्रीवादळाच्या प्रभावामुळे १० मेपर्यंत रोजी काही ठिकाणी ताशी ७०-८० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून याची तीव्रता ९ तारखेपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता आहे. नंतर हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात पुढे उत्तरेकडे प्रवास करेल. यामुळे अंदमान निकोबारला ८-१२ मेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. इतकंच नाहीतर या दरम्यान, मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.