अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; ‘या’प्रकरणात पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल

307
मुंबईत मराठी लोकांसाठी ५० टक्के घरे आरक्षित ठेवा; Anil Parab यांची मागणी

कोकणातील दापोली इथल्या साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात ईडीने तपास सुरू केला असून परब यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप आहेत. तसेच याप्रकरणी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्यावर कारवाई केली आहे. पण अनिल परब यांना तूर्तास मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. आरोपपत्रात या तिघांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे असे कळते. याप्रकरणी मंगळवारी, ९ मेला सुनावणी होणार आहे.

(हेही वाचा – Raj Thackeray : राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे काकांना दादांची भिती वाटतेय का?)

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जाहीरपणे परब यांच्यावर या प्रकरणात आरोप केले आहेत. सोमय्या यांनी या प्रकरणी अनेक कागदपत्रे देखील जाहीर केली आहेत. तसेच केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने देखील या रिसॉर्टवर कारवाई केली आहे. परब यांनी सातत्याने या प्रकरणात माझा संबंध नाही, असे जाहीर केले असले, तरी ईडीने त्यांना अनेकदा चौकशीसाठी बोलावले आहे. आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यावर सर्व आरोपींना भूमिका विचारण्यात येते. त्यानंतर न्यायालय आरोप निश्चित करते आणि मग खटल्याला प्रारंभ होतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.