काही वर्षांपूर्वी १८५ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने आलेल्या तौक्ते तुफानाने (Cyclone) देशातल्या अनेक भागांचे लक्षणीय नुकसान केले होते. त्या सारखेच आणखी एक तुफान लवकरच भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ (Cyclone) हळूहळू विकसित होत आहे. या वादळाचे स्वरूप पूर्वीच्या इतर वादळांसारखे भीषण असेल की नाही याचा अंदाज या घडीला लावणे शक्य नाही.
(हेही वाचा – Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका)
अमेरिकेच्या ग्लोबल फोरकास्ट सिस्टीमने वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात ११ ते १५ मे दरम्यान मान्सूनपूर्व चक्रीवादळ (Cyclone) तयार होण्याची शक्यता आहे. ‘मोचा’ नामक हे वादळ बांगलादेशसह ओडिशात धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही पहा –
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. १० मे रोजी ‘मोचा’ चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजेच ११ मे रोजी बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीकडे हे चक्रीवादळ (Cyclone) सरकेल असा अंदाज आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीला कोणताही धोका नसल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र बंगालच्या उपसागर, अंदमान आणि निकोबार या बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच या वादळाचं गांभीर्य लक्षात घेत ८ मे ते १२ मे दरम्यान मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
बंगालच्या उपसागरात (Cyclone) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून ८ ते १२ मे दरम्यान किनार पट्टीवर ताशी ७० किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. ८ ते १२ मेपर्यंत समुद्र खवळलेला राहणार असल्याने या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सोबतच बंगालच्या उपसागरातील आणि अंदमानच्या बेटांवरील पर्यटन आणि शिपिंगबाबत नियमावली जाहीर करत समुद्राकडे न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Cyclone)
Join Our WhatsApp Community