प्रथमच आलेल्या मासिक पाळीतून १२ वर्षीय मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. ही धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे ७ मे रोजी घडली आहे. बहिणीच्या कपड्यावर रक्ताचे डाग बघून भावाचा गैरसमज होऊन त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला जबर मारहाण केली. या मारहाणीत १२ वर्षीय बहिणीचा मृत्यु झाला असून पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून भावाला अटक करण्यात आली आहे.
नक्की काय घडले?
अटक करण्यात आलेला भाऊ हा ३० वर्षाचा असून एका खासगी ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होता. आरोपी हा आपल्या १२ वर्षांच्या बहिणीसह मेव्हण्याच्या घरी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे राहण्यास होता. १२ वर्षांची मुलगी ही आरोपीची सख्खी बहीण होती. गेल्या आठवड्यात मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी आली होती. त्यामुळे तिच्या कपड्यावर रक्ताचे डाग पडले होते. या वयात पहिल्यांदाच आलेल्या मासिक पाळीमुळे मुलगी घाबरली होती. भाऊ कामावरुन घरी आल्यावर त्याने बहिणीच्या कपड्यावर रक्ताचे डाग बघून संतापला व त्याने १२ वर्षांच्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्याने तिला प्रश्न विचारले परंतु मासिक पाळेमुळे अगोदर घाबरल्यामुळे ती गप्प होती, भावाला काय सांगावे हे तिला कळत नव्हते.
(हेही वाचा – NIA Raids: टेरर फंडिंग विरोधात एनआयएची मोठी कारवाई; काश्मिर ते तामिळनाडूपर्यंत छापेमारी)
बहीण काही बोलत नसल्यामुळे संतापलेल्या भावाने तिला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, तसेच स्टीलच्या पक्कडीने तिला मारहाण केली. या मारहाणीत मुलगी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली. त्यानंतर भावानेच तातडीने तिला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेला. तिच्यावर उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशीच तिचा मृत्यू झाला.
उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात जखमी अवस्थेत मुलीला आणले त्यावेळी तेथील डॉक्टरांनी पोलिसांना कळवले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ही हत्या गैरसमजुतीतून झालेली असून याप्रकरणी भावाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community