Mumbai-Goa Highway : परशुराम घाटामुळे मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावर Mummbai-Goa Highway परशुराम घाटात दरड कोसळल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या आहेत.

227
परशुराम घाटामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा ठप्प
परशुराम घाटामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा ठप्प

मुंबई-गोवा महामार्गाच्या Mumbai-Goa Highway चौपदरीकरणाचे काम मागील एक दशकाहून अधिक काळापासून सुरु आहे, तरीही महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. कारण ज्या परशुराम घाटामधून चौपदरीकरणाचे काम सुरु करण्यात आले, त्यात मुळात तो डोंगर ढिसूळ असल्यामुळे खोदकाम करताच दरड कोसळत आहे. आणि काम कमी होण्याऐवजी वाढत आहे. यंदाचा पावसाळा अजून सुरूही झाला नाही. मंगळवार, ९ मे रोजी काही वेळ नुसता पाऊस पडला तर परशुराम घाटातील दरड कोसळली आणि वाहतूक ठप्प झाली. घाटातील चिखल, माती काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

वाहतूकीची कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावर Mumbai-Goa Highway परशुराम घाटात दरड कोसळल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या आहेत. परशुराम घाटाला पर्यायी मार्ग असणाऱ्या चिरणी आंबडस मार्गावरही वाहतुकीची कोंडी झाली होती. पहाटे पडलेल्या पावसामुळे भरावातील मातीचा चिखल रस्त्यावर आल्याने वाहने चिखलात रुतली आहेत. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून नागरिकांना प्रवास सर्तकतेने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(हेही वाचा Staff Reduction : पुन्हा एकदा टेक कंपनीमध्ये होणार मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात)

पर्यायी मार्ग कोणता?

  • मुंबई-गोवा महामार्गावरून Mumbai-Goa Highway प्रवास करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करता येणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर असलेला परशुराम घाट आणि कशेडी येथील खवटी घाट वगळून दुसऱ्या मार्गाचा वापर करता येऊ शकतो.
  • मुंबईकडून कोकणात जाताना महाड – लाटवण मार्गे दापोली आणि दापोली येथून दाभोळ – धोपावे फेरीबोटीने धोपावे येथून श्रृंगारतळी मार्गे थेट गुहागर आणि चिपळूण तसेच रत्नागिरी येथे जाता येते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.