मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस (Police) आयुक्तांच्या मुख्यालयातच अँटी करप्शन विभागाने सापळा लावून वरिष्ठ लिपिक आणि लिपिक यांच्यावर दीड हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
एका पोलिस (Police) कर्मचाऱ्याचे वैद्यकीय बील मंजूर करण्यासाठी आणि सातवे वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळण्यासाठी लिपिकांनी त्यांच्याकडे दीड हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
(हेही वाचा – नात्याला काळीमा फासणारी घटना; मासिकपाळीच्या गैरसमजुतीतून १२ वर्षीय मुलीची भावाकडून हत्या!)
संजय पवार (४६) आणि गणेश वाघेरे (३२) अशी लिपिकांची नावं आहेत. तक्रारदार हे मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस (Police) दलाचे कर्मचारी आहेत. तक्रारदार यांनी वैद्यकीय बिल मिळण्यासाठी तसेच सातव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला होता. यासाठी त्यांच्याकडे लिपीकाने दीड हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
हेही पहा –
या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पालघर युनिट यांनी मंगळवार ९ मे रोजी सापळा रचुन लिपीकाविरुद्ध लाच प्रकरणी गुन्हा दाखल करून सापळा रचण्यात आला होता. (Police)
Join Our WhatsApp Community