बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (यूनाइटेड) चे राष्ट्रीय नेते नीतीश कुमार (Nitish Kumar) ११ मे रोजी मुंबईत येत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची ते यावेळी भेट घेतील.
नीतीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासोबत बिहार विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर आणि बिहार सरकारचे मंत्री संजय कुमार झा असणार आहेत. देवेशचंद्र ठाकूर यांनी नुकतीच मुंबईत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली होती.
(हेही वाचा – Shraddha Walker Murder Case : श्रद्धाचे ३५ तुकडे करूनही आफताब म्हणतो ‘मला गुन्हा अमान्य’)
विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी नीतीश कुमार (Nitish Kumar) देशभर नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि आज ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची नीतीश कुमार यांनी भेट घेतली.
हेही पहा –
मुंबईत ‘मातोश्री’ वर नीतीश कुमार (Nitish Kumar) उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नीतीश कुमारांना स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं आहे. ते नीतीश कुमारांनी स्वीकारलं आहे. ‘मातोश्री’ भेटीनंतर नीतीश कुमार ‘सिल्वर ओक’ वर शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
Join Our WhatsApp Community