ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार नितेश राणे यांची एका दिवसाच्या विश्रांतीनंतर बुधवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी नितेश राणेंनी कैदी नंबर ८९५९, लँडमाफिया, चपट्या पायाचा, पणवती, घरफोड्या असा उल्लेख संजय राऊतांचा उल्लेख करत त्यांच्यावर घणाघात केला. तसेच नितेश राणेंनी अलिबागमधील एका मराठी कुटुंबायांना दमदाटी करून राऊतांनी कशाप्रकारे जमीन बळकावली, हे सांगितले.
नक्की काय म्हणाले नितेश राणे?
‘एकाबाजूला तू (संजय राऊत) भाषण माफिया म्हणत असताना तू किती मोठा लँडमाफिया आहेस याचे काही पुरावे मी महाराष्ट्राला देऊ का? अलिबागच्या किहीम बीचवर तुला जो फ्लॉट हवा होता, म्हणून एका मराठी कुटुंबाकडून कोडीमोल भावामध्ये दमदाटी करून घेतला. उशीरकर नावाचे ते कुटुंब. त्यांना याने अशरक्षः दमदाटी केली. आता किहीम बीचवर रिसॉर्ट बांधण्याचे मनसुबे याचे आहेत. कोट्यावधींची जमिनी याने अवघ्या काही २० ते १५ कोटीमध्ये घेतली. तर दुसऱ्यांना माफीया बोलणारा तू किती लँडमाफिया आहेस? याचे पण उत्तर महाराष्ट्राला दिले पाहिजे. भांडूप, विक्रोळी या परिसरात आर वरून सुरू होणाऱ्या बिल्डरसोबत तुझी जी पार्टनरशिप आहे. र म्हणजे आर. त्यामुळे समजने वालो को सिर्फ इशारा काफी है. या बिल्डरसोबत तुझी जी पार्टरशिप आहे, त्या निमित्ताने किती लोकांच्या जमिनी बळकवल्या आहेत? याचे पण उत्तर या लँडमाफियाने आमच्या नेत्यांवर तोंडसुख घेण्याअगोदर द्यावे,’ असे नितेश राणे म्हणाले.
बेळगावच्या मराठी जनतेला केले आवाहन
तसेच नितेश राणे पुढे म्हणाले की, ‘आज त्याची न्यायालयात हजेरी आहे. त्यामुळे मी माझ्या बेळगावच्या जनतेला आवर्जुन सांगणे की, हा आरोपी कैदी नंबर ८९५९ तुमच्यासमोर येतो. तो तुमच्यासमोर आला भाषण केली, मराठी माणसाच्या हितासाठी भाषण केली. हा आरोपी कैदी नंबर ८९५९ त्यांची न्यायालयात हजेरी आहे. हजेरी का आहे नेमकी, कारण मराठी माणसाची पत्रा चाळीतली घर याने लाटली, बळकावली. मराठी माणसाला याने फसवले. म्हणून याला बुधवारी त्याच्या पार्टनरसोबत न्यायालयात हजेरी लावायची आहे. हा बोंबलतो सगळीकडे की माझ्यावर चुकीचा गुन्हा दाखल केला. हा स्वतः बेलवर बाहेर आहे. त्यामुळे बेळगावाच्या जनतेला मी सांगणे की, अशा दरोडेखोराला, अशा लुटमार करणाऱ्याला, अशा चापटमाणसाला, ज्याने मुंबईतील मराठी माणसांची, अलिबागच्या त्या मराठी कुटुंबाची जमिनी बळकवली. अशा चपट्या पायाचा, पणवती असलेला घरफोड्या माणूस त्याच ऐकून तुम्ही चुकीच्या लोकांनी मतदान करू नका. तुम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय घ्या.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community