‘हा’ आजार २४ तासांत ६ जणांचा जीव घेतोय!

184
मुंबईत 'हा' आजार २४ तासांत ६ जणांचा जीव घेतोय!
मुंबईत 'हा' आजार २४ तासांत ६ जणांचा जीव घेतोय!

अयोग्य जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणाचा फटका मुंबईकरांना बसतो आहे. जगातील सर्वाधिक ५० प्रदूषित शहरांमध्ये भारतातील तब्बल ३९ शहरांची वर्णी लागते. वाढत्या हवेच्या प्रदूषणामुळे वेगवेगळ्या जीवघेण्या रोगांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मुंबईकरांना सध्या फुफ्फुसाच्या रोगांनी हैराण केले आहे. गेल्या वर्षभरात प्रत्येक दिवशी, २४ तासांत सीओपीडीच्या आजाराने ६ जणांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सीओपीडी म्हणजे काय?

मुंबईतील एक गंभीर आजार म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. २०१६ ते २०२१ या पाच वर्षांच्या कालावधीत फक्त मुंबई भागात १४ हजार ३९४ रुग्णांचा सीओपीडीमुळे मृत्यू झाला. हा आजार श्वसनामार्फत होतो. श्वसनाच्या नळ्या आणि फुफ्फुसाचा काही भागाला या रोगामुळे नुकसान पोहोचते. अहोरात्र सुरू असणारे बांधकाम, वाहनांतून बाहेर पडणारा धूर, औद्योगिक प्रदूषण यामुळे हवेचा दर्जा खालावतो.

हा आजार ओळखायचा कसा?

  • श्वास घेण्यास सातत्याने त्रास होणे
  • फुफ्फुसाला हवेचा कमी पुरवठा होणे
  • अनेकदा वरील लक्षणांकडे रुग्ण दुर्लक्ष करतात. स्पायरोमीटर टेस्ट केली तर पहिल्या टप्प्यात रोगाचे निदान होऊ शकते.

‘या’ वॉर्डमध्ये नोंदवले गेले सर्वाधिक मृत्यू

  • ई वॉर्ड (९८१)
  • एफ उत्तर (९९४)
  • एफ दक्षिण (९६२)
  • के पश्चिम (९०२)
  • आर दक्षिण (७७९)

डॉक्टर काय म्हणाले?

एका वरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांनी अधिक माहिती दिली. डॉक्टर म्हणाले की, सीओपीडी हा एक टाळता येणारा आजार आहे. पण त्यावर कोणताही इलाज नाही. इतर आरोग्य स्थितीमुळे ग्रस्त व्यक्तीला वेळेवर उपचार न मिळाल्यास परिस्थिती बिघडते. धूम्रपानाची सवय आणि प्रदूषण हे सीओपीडीसाठी मुख्य जोखीम घटक आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये धूम्रपानाच्या वाढत्या सवयींमुळे महिलांमध्ये सीओपीडी प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे धूम्रपानासारख्या सवयी बदलणे गरजेचे आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.