तरुण पिढी सोशल मीडियाचा पूर्णपणे आहारी गेली आहे, हा आरोप खरा ठरवणारी एक घटना नुकतीच घडली आहे. प्रत्यक्षात मित्र नसतील, मात्र आपल्या फॉलोवर्सना खुश करण्यासाठी हे नको नको ती उचापती करत असतात. आता आम्ही तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती हैदराबादमधली आहे.
मोहम्मद सर्फराज नावाच्या किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला कारण त्याला त्याच्या फॉलोवर्सना खुश करायचे होते. काही मित्र व्हिडिओ बनवण्यासाठी चालत्या ट्रेनच्या समांतर साईड ट्रॅकवरून धावत होते. पण सर्फराजच्या मस्तीमुळे तो त्याच ट्रॅकवरून धावला जिथून ट्रेन येत होती. या मुलाचा जीव गेला आणि ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.
सर्फराज आणि त्याचे मित्र सोशल मीडियावर साहसी व्हिडिओ बनवायचे. त्यामुळे त्यांनी रेल्वे ट्रॅकवरून धावण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्या जीवावर बेतला. मृत्यूनंतर त्याच्याकडे मोबाईल फोन सापडला आहे. तरुणाईला असला मूर्खपणा करण्यापासून परावृत्त केले पाहिजे. आपण पाहत असतो की सोशल मीडिया अत्यंत फालतू कंटेंट्सना देखील लाखो व्ह्यूज मिळत असतात. सोशल मीडियाचा जसा फायदा आहे तसा तोटाही आहे. पालकांनी देखील आपल्या मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे. नाहीतर अशा अनेक घटना घडत राहतील. हे नको असेल तर आपण वेळीच जागं झालं पाहिजे.
Join Our WhatsApp Community