मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा आणि निवडणुकांना सामोरे जावे, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केले होते. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. (Maharashtra Political Crises)
(हेही वाचा – Maharashtra Political Crises : न्यायालयाच्या निर्णयामुळे ‘मविआ’च्या मनसुब्यांवर पाणी फेरले – देवेंद्र फडणवीस)
उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
भाजपसोबत निवडून आलात आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलात तेव्हा कुठल्या डब्यात ही नैतिकता बंद केली होती. याचे पहिल्यांदा उत्तर द्या. खरं म्हणजे नैतिकतेच विषय तुम्ही सांगू नये. कारण तुम्ही खुर्ची करता विचार सोडला आणि एकनाथ शिंदेंनी (Maharashtra Political Crises) विचारांसाठी खुर्ची सोडली. ते सत्तेत होते, त्यानंतर ते विरोधी पक्ष म्हणजे आमच्यासोबत आले. त्यामुळे नैतिकतेविषयी बोलण्याचा तुम्हाला कुठलाही नैतिक अधिकार नाही. उद्धवजी तुमच्या लक्षात आले होते, तुमच्याकडे नंबर नाही, तुम्ही हरणार आहात, लोकं तुम्हाला सोडून गेलेत. त्यामुळे त्या लाजेपोटी आणि त्या भीतीपोटी तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलात. त्यामुळे विनाकारण त्याला नैतिकेचा मुलामा चढवण्याचा प्रयत्न करू नका. एकनाथ शिंदेंनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. (Devendra Fadnavis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community