बनावट नोटांच्या प्रकरणात मुंबईत सहा ठिकाणी NIAची धाड; प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हात

181
बनावट नोटांच्या प्रकरणात मुंबईत सहा ठिकाणी NIAची धाड; प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हात
बनावट नोटांच्या प्रकरणात मुंबईत सहा ठिकाणी NIAची धाड; प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हात

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या पथकाने बनावट नोटा संबंधित मुंबईत सहा ठिकाणी छापेमारी केली आहे. ही छापेमारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीच्या संबंधित आरोपीच्या घरी करण्यात आली आहे. या छापेदरम्यान एनआयएने बनावट नोटा संबंधित यंत्रणा तसेच शस्त्र, डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. ठाणे पोलिसांनी २०२१ मध्ये केलेल्या बनावट नोटा प्रकरणी केलेल्या कारवाई संबंधित एनआयएने बुधवारी मुंबईत छापेमारी केली असून या प्रकरणाशी दाऊद इब्राहिम याचा थेट संबंध असल्याची माहिती तपासात पुढे येत आहे.

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२१ मध्ये बनावट नोटा प्रकरणी कारवाई करून रियाज आणि नासिर या दोघांना अटक करून त्याच्या जवळून मोठ्या प्रमाणात ५०० आणि २००० हजार रुपयांच्या भारतीय चलनातील बोगस नोटा जप्त करण्यात आलेल्या होत्या. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे पोलिसांनी या गुन्ह्यात न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल केलेले आहे. अटक करण्यात आलेले दोघे मुंबईत राहणारे असून या दोघांचा थेट संबंध डी-कंपनीशी असल्याची माहिती एनआयएच्या तपासात समोर आली होती. दरम्यान एनआयएकडून ७ फेब्रुवारी २०२३ मध्ये या प्रकरणात वेगळा गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सुरू केला होता.

(हेही वाचा – हरियाणातील अभिनेत्रीवर मुंबईत लैंगिक अत्याचार)

या एनआयएच्या तपासात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा बनावट नोटा प्रकरणाशी थेट संबंध असल्याचे समोर आले. ठाणे पोलिसांनी अटक केलेले नासीर आणि रियाज हे दोघे अद्याप तुरुंगात असून एनआयएकडून बुधवारी रियाज आणि नासीर यांचे राहते घर आणि कार्यालय अशा एकूण सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत एनआयएच्या हाती डी-कंपनी संबंधित काही पुरावे, तसेच डिजिटल उपकरणे, बनावट नोटांसाठी वापरण्यात येणारे कागद, तसेच काही महत्वाचे कागदपत्रे आणि धारदार शस्त्रे मिळून आली आहे. एनआयएच्या तपासात रियाज आणि नासीर हे दोघे थेट दाऊद याच्या संपर्कात होते अशी माहिती समोर येत असून दाऊद इब्राहिम बनावट नोटांच्या सिंडिकेट चालवत या बनावट नोटा भारतातील वितरित केल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.