Heat waves : राज्यात तापमानाचा पारा वाढला

१४ मे पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्णतेमुळं अस्वस्थता जाणवणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

204
Heat waves : राज्यात तापमानाचा पारा वाढला

एप्रिल महिन्यात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्याचा शेती पिकांवर मोठा परिणाम झाला. अशातच आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील तापमानाचा पारा (Heat waves) वाढणार आहे. एकीकडे मे महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भात नद्यांना पूर आला आहे तर दुसरीकडे तापमानात पुन्हा वाढ होत आहे.

(हेही वाचा – पूर्व उपनगरातील ‘या’ वॉर्डात दर शनिवारी राहणार पाणी बंद)

राज्यातील तापमानाचा पारा (Heat waves) दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढला आहे. आर्द्रतायुक्त आणि गरम हवेमुळं पुढील तीन दिवस म्हणजेच १४ मे पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्णतेमुळं अस्वस्थता जाणवणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. (Heat waves)

हेही पहा –

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह संपूर्ण कोकणात तापमानात (Heat waves) वाढ होणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात सध्या सरासरीइतकं किंवा त्याखाली जाणवत असलेले दिवसाचे कमाल तापमान वाढणार आहे. मात्र, तिथे वातावरण पूर्ववत होऊ शकते असंही हवामान विभागानं सांगितलं आहे. मोचा चक्रीवादळाचे (Cyclone Mocha) पोर्ट ब्लेअरपासून ५०० किमी अंतरावर अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.