Uddhav Thackeray : ‘…तर आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ’ – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपले मत मांडले. यावेळी त्यांनी राज्यपाल आणि शिंदे - फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले.

236
Uddhav Thackeray : '...तर आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ' - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे असा (Maharashtra Political crisis) सत्तासंघर्ष सुरु झाला. या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार ११ मे २०२३ रोजी आपला निर्णय दिला. त्या निर्णयानुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर माझी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपले मत मांडले. यावेळी त्यांनी राज्यपाल आणि शिंदे – फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मी नैतिकतेला जागून माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, मी (Uddhav Thackeray) आजही माझ्या या निर्णयावर समाधानी आहे. महाराष्ट्रात बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ताधाऱ्यांचा खोटा चेहरा कोर्टाने उघड केला. महाराष्ट्राची अवहेलना सुरु आहे. सरकारला मिळालेलं जीवदान हे तात्पुरते असून सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतल्यास आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ,असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

(हेही वाचा – Maharashtra Political Crisis: भाजपाचा विश्वासघात करणाऱ्यांना नैतिकतेचे सल्ले देण्याचा अधिकारच नाही; नारायण राणेंची खोचक टीका)

उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्ला

विश्वासघातकी लोकांचा सोबत राहून मला मुख्यमंत्रीपद नको होते आणि म्हणूनच मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. जिथे हिंदुत्व आहे तिथे नैतिकता देखील आहे. त्यामुळे आताच्या बेकायदेशीर सरकारने नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे. आपण निवडणुकीला सामोरे जावू या असे मी त्यांना आव्हान देतो. कारण जनतेचे न्यायालय हे सर्वोच्च आहे. शिंदे – फडणवीस सरकारनं जनतेला सामोरं जावं. त्यांनी जनतेचा कौल लक्षात घ्यावा. त्यांनी इतक्यात फटाके वाजवून जल्लोष करण्याची गरज नाही. (Uddhav Thackeray)

हेही पहा – 

पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार

विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा. मात्र त्यांनी वेडावाकडा निर्णय घेतला तर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ. ज्याप्रमाणे आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायलयात गेले होतो, त्याचप्रमाणे अध्यक्षांच्या निर्णयाविरोधातही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. मग सरकारची होणारी बदनामीला ते जबाबदार असतील. (Uddhav Thackeray)

विधानसभा अध्यक्ष यांच्यावर टीका

कायद्याच्या चौकटीत पक्षांतर करायचं हे नार्वेकरांना माहीत आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांना टोला लगावला आहे. (Uddhav Thackeray)

राज्यपालांची भूमिका अत्यंत घृणास्पद

महाराष्ट्राची बदनामी थांबली पाहिजे. सराकारनं लवकरात लवकर राजीनामा देणं गरजेचं असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आमची मागणी आहे की राज्यात लवकरात लवकर निवडणुका घ्यायला पाहिजेत ह आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षांची निवड कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हेसुद्धा तपासणं गरजेचं असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यपालांची भूमिका अत्यंत घृणास्पद आहे. राज्यपाल ही संस्था बरखास्त करायला पाहिजे. असे ते म्हणाले. निवडणूक आयुक्त नेमण्याची सुद्धा एक प्रक्रिया पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray)

पंतप्रधान मोदी यांना विनंती

उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान यांना शिंदे – फडणवीस सरकारला राजीनामा देण्यास भाग पडण्याची विनंती केली आहे. राज्यात सध्या नंगानाच सुरु आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान म्हणून तुम्हाला ते शोभा देत नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सरकारकडून राजीनामा घ्यावा. अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Uddhav Thackeray)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.