स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती सप्ताहाची सुरुवात होणार ‘सावरकर दौड’ने

304
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती सप्ताहाची सुरुवात होणार 'सावरकर दौड'ने
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती सप्ताहाची सुरुवात होणार 'सावरकर दौड'ने

वीर सावरकर जयंती सप्ताह प्रारंभ निमित्त पुण्यात २१ मेपासून ‘सावरकर दौड’ आयोजित करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि विवेक व्यासपीठ यांच्या सहकार्याने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय ते डेक्कन कॉर्नर येथील वीर सावरकर अद्यासन केंद्र या मार्गावर ‘सावरकर दौड’ होणार आहे. सकाळी सात ते नऊ या वेळत ‘सावरकर दौड’ असणार आहे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), युद्ध सेवा मेडल ने सन्मानित, ज्येष्ठ सेना अधिकारी आणि सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सौरभ गोखले यांच्या हस्ते निशाण दाखवून ‘सावरकर दौड’ला सुरुवात होईल. वीर सावरकर आणि सैनिकीकरण या विषयावरील माहितीने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar : भारतातली पहिली अंदमान युवा यात्रा; वीर सावरकर समजून घेण्यासाठी युवकांना संधी)

ही दौड फर्ग्युसन महाविद्यालय – ज्ञानेश्वर पादुका चौक – मॉडर्न महाविद्यालय – बालगंधर्व – डेक्कन जिमखाना – डेक्कन कॉर्नर (वीर सावरकर अध्यासन केंद्र येथे समारोप) या मार्गावरून असेल. या दौड कार्यक्रमात सर्व वयोगटातील स्त्री पुरुष सहभागी होणार असून यात विविध सामाजिक संस्थांना सहभागी करून घेणार आहोत.

सहभागी होण्यासाठी….

जास्तीत जास्त वीर सावरकरप्रेमींना या ‘सावरकर दौड’मध्ये सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म भरावा लागेल. त्यासाठी पुढे दिलेल्या गुगल फॉर्मच्या https://formsgle/Wk5dhxG7temgb8qs लिंकवर क्लिक करा. तसेच अधिक माहितीसाठी ९५६१४९१६२५, ९८५०४०९०४१, ९४२०७८७०४८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.