परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारात गुरुवार ११ मे रोजी एक अपघात झाला. या अपघातात पाच सफाई कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एक कामगार अत्यवस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. (Septic Tank Accident)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर (Septic Tank Accident) दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
(हेही वाचा – Septic Tank Accident: सेप्टिक टॅंकच्या सफाई दरम्यान ५ कामगांरांचा मृत्यू)
भाऊचा तांडा या परिसरातील एका शेतकऱ्याच्या घरातील सेप्टिक टॅंक (Septic Tank Accident) स्वच्छ करण्याचे कंत्राट या कामगारांनी घेतले होते. मृत झालेल्या पाच कामगारांमध्ये शेख सादेक (वय ५५), शेख जुनेद (वय ३२) शेख शारोक (वय २८), शेख नवीद (वय २८), आणि शेख फेरोज (वय २९) यांचा समावेश आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community