जगावेगळ्या निर्णयांमुळे आणि तडकाफडकी अंमलबजावणी करण्यामुळे एलॉन मस्क कायम चर्चेत असतात. मागच्या वर्षाच्या अखेरीस तब्बल ४४ अब्ज रूपये मोजून त्यांनी ट्विटर कंपनी विकत घेतली होती. काही महिने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या पदावर काम केल्यानंतर त्यांनी आता राजीनाम द्यायचे ठरवले आहे. १२ मे रोजी रात्री १ वाजता त्यांनी ही घोषणा केली.
त्यांच्या या आकस्मिक घोषणेमुळे उलट्या सुलट्या चर्चांना उधाण आले आहे. ट्विटवर पोस्ट करत मस्क म्हणाले की, सहा आठवड्यात एक नवीन व्यक्ती कंपनीचे सीईओ पद स्वीकारले. पाच अब्जाहून अधिक महसूल कमवणाऱ्या या कंपनीच्या सीईओपदी एक महिला बसणार आहे. त्या महिलेचे नाव कंपनीने अधिकृतरित्या जाहीर केले नाही. तरीही एका नावाची चर्चा या संदर्भात होते आहे.
लिंडा यांचे नाव आले कुठून…
मस्क यांनी पुढील सीईओ कोण असेल याबद्दल वाच्यता केली नाही. तरीही अमेरिकेच्या लिंडा याकरता पुढील सीईओ असतील असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे.
(हेही वाचा The Kerala Story : चित्रपट देशभर सुरु मग प. बंगालमध्येच का बंदी? सर्वोच्च न्यायालयाने सुनावले)
या ७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतील ..
- पेन्सिलवेनिया शहरातल्या पेन्न स्टेट या विद्यापीठातून लिंजा यांनी शिक्षण पूर्ण केले.
- त्यांनी लिबरल आर्ट्स आणि टेलिकम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे.
- लिंडा यांनी एनबीसी युनिवर्सल येथे दशकभर काम केले आहे. तिथे त्यांनी जाहिरात विक्रीच्या प्रमुख पदी काम केले.
- १९ वर्षे त्यांनी टर्नर एंटरटेनमेंट येथे काम केले होते.
- काही दिवसांपूर्वी त्यांनी मायामी येथील कार्यक्रमात मस्क यांची मुलाखत घेतली होती.
- त्या मस्क यांच्या समर्थक आहेत.
- त्यांची आणि अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती डोनाल्ट ट्रंप यांची चांगली मैत्री आहे.