Radhakrishna Vikhe Patil : ‘संजय राऊत म्हणजे वैफल्यग्रस्त झालेला माणूस’ – राधाकृष्ण विखे पाटील

संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर काय भाष्य करणार

290
Radhakrishna Vikhe Patil : 'संजय राऊत म्हणजे वैफल्यग्रस्त झालेला माणूस' - राधाकृष्ण विखे पाटील

कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Election Results 2023) २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा शनिवार १३ मे रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे जनतेचा कौल नेमका कोणाच्या पक्षात पडणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. एक्झिट पोलचा कौल काँग्रेसच्या बाजूचे असला तरी त्यांचा अंदाज खरा ठरणार की भाजप बाजी मारणार हे या निकालातून निश्चित होणार आहे. अशातच भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कर्नाटच्या निवडणुक सोबतच संजय राऊत, सीमावर्ती भाग आणि वाळू माफिया या मुद्द्यांवर देखील प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?

सध्या कर्नाटक निवडणुकीचे सुरवातीचे निकाल येत आहेत, दुपारपर्यंत अंतिम चित्र स्पष्ट होईल.पूर्ण निकाल आल्यावर खरी चर्चा होईल. स्थानिक राज्याच्या निवडणुकांचे विषय वेगळे असतात त्यामुळे त्याचा संबंध केंद्राशी जोडणे योग्य नाही. संपूर्ण निकाल आल्यावर केंद्रीय नेतृत्वाची प्रतिक्रया येईल. असे राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले. तसेच, त्यांनी पुढे बोलतांना संजय राऊत यांच्यावर टीका केली.

(हेही वाचा – Karnataka Election Results 2023 : कर्नाटक निवडणुकांवर संजय राऊत यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…)

राऊत यांना तुम्ही इतकं महत्व का देता?

संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर काय भाष्य करणार, भाडोत्री माणसावर काय बोलणार. राऊत यांनी सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी केली मात्र त्यांची भविष्यवाणी कधी खरी झाली नाही. त्यामुळे संजय राऊत कडे दुर्लक्ष करा. तसेच संजय राऊत म्हणजे वैफल्यग्रस्त झालेला माणूस आहे. येत्या काही दिवसांनी त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसून येईल. (Radhakrishna Vikhe Patil)

सीमा प्रश्न सोडवण्यासाठी भाजप प्रयत्नशील

सीमा प्रश्नावरून विरोधीपक्ष राजकारण करत आहेत. मात्र सीमा प्रश्न सोडवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमाभागात सभा घेतली. त्यामुळे सीमा भागातील नागरिक यांचा भाजपवर विश्वास आहे हे यामधून स्पष्ट झाले. (Radhakrishna Vikhe Patil)

हेही पहा – 

थोडा वेळ लागेल पण आम्ही यशस्वी होऊ

वाळू माफियांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाळू माफियांना मोडकळीस काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही जे धोरण वाळू संदर्भात घेतले आहे ते यशस्वी होईल. या सगळ्यासाठी थोडा वेळ लागेल मात्र आम्ही नक्कीच यशस्वी होऊ अशी मला खात्री आहे. (Radhakrishna Vikhe Patil)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.