कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Election Results 2023) २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा (Karnataka Election Results 2023) शनिवार १३ मे रोजी निकाल लागला आहे. या निकालानुसार भाजप पक्षाला धक्का बसला असून काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. काही दिवसांपूर्वी एक्झिट पोलचा कौल देखील काँग्रेसच्या बाजूने दिला होता. त्यानुसार जनतेने देखील अंतिम निर्णय काँग्रेसच्या बाजूने दिला आहे. आता मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व परिस्थितीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले राहुल गांधी?
मी (Rahul Gandhi) सर्वात आधी कर्नाटकच्या जनतेला, काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांचं अभिनंदन करतो. कर्नाटक निवडणुकीत एका बाजूला भांडवलशाहीची ताकद होती आणि दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती होती. या गरीब जनतेच्या शक्तीने भांडवलशाहीचा पराभव केला. हेच प्रत्येक राज्यात होईल. काँग्रेस कर्नाटकात गरीबांबरोबर उभा राहिला. आम्ही गरीबांच्या मुद्द्यावर निवडणूक लढलो.
(हेही वाचा – Karnataka Election Results 2023 : भाजपाला धक्का; काँग्रेस पक्षाची आघाडी)
काँगेस विजयी
काँग्रेस १३६ (Karnataka Election Results 2023) जागांवर आघाडीवर आहे. म्हणजेच काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असून मोठी उलथापालथ झाली नाही तर संख्याबळात बदल होण्याची अपेक्षा नाही. सत्ताधारी भाजप ६४ जागांवर आघाडीवर असून, बहुमताच्या फार मागे आहेत. त्यावेळी राज्यात किंगमेकर बनण्याची आशा असलेला जेडीएस २० जागांवर पुढे आहे. इतरांची ४ जागांवर आघाडीवर आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community