Munawar Faruqui : हिंदुद्वेष्ट्या मुनावर फारुकीला आयपीएलमध्ये स्टार स्पोर्ट्सने दिले व्यासपीठ; सोशल मीडियात नेटकऱ्यांनी सुनावले

मुनावर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन आहे. जो आपल्या कॉमेडी दरम्यान हिंदू देवी-देवतांची खिल्ली उडवण्यासाठी कुप्रसिद्ध आहे.

344

हिंदूद्वेषी स्टॅन्डअप कॉमेडियन मुनावर फारुकी ज्याने हिंदू देवतांचे विडंबन करून सवंग प्रसिद्धी मिळवली. त्याला स्टार स्पोर्ट्सवर आयपीएल सामन्यांदरम्यान शो होस्ट करण्याची संधी मिळाली. स्टार स्पोर्ट्सवर हिंदूफोबिक कॉमेडियन मुनावरला पाहून सोशल मीडिया नेटकरी चांगलेच भडकले.

टाटा आयपीएल 2023 चे लीग सामने खेळले जात आहेत. शुक्रवारी, 12 मे रोजी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. मुनावर फारुकी, इतर क्रिकेटपटू आणि चित्रपट कलाकारांसह, स्टार स्पोर्ट्सवर सामन्याचे यजमान म्हणून दिसले. मुनावर व्यतिरिक्त अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, मोहम्मद कैफ आणि इरफान पठाण देखील शो दरम्यान उपस्थित होते.

स्टार स्पोर्ट्सवरील मुनावर फारुकीची उपस्थिती यूजर्सना आवडली नाही, शोचा स्क्रीन शॉट शेअर करताना एका यूजरने लिहिले की, “वाह आता जातीयवादी धर्मांधांनीही स्पोर्ट्स चॅनलचे शो करायला सुरुवात केली आहे.”

सिबा प्रसाद शुक्ला नावाच्या युजरने लिहिले आहे की, आज स्टार स्पोर्ट्स चॅनलने आपला एक ग्राहक गमावला आहे. स्टार स्पोर्ट्सची जागा जिओ सिनेमाने घेतली.

(हेही वाचा Karnataka Assembly election : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदरी निराशा)

मनोरमा नावाच्या युजरने लिहिले की, “हिंदूविरोधी असल्याने लोक श्रीमंत होतात.”

नाराजी व्यक्त करत किरण कसाला नावाच्या युजरने लिहिले की, या लोकांसाठी पैसा महत्त्वाचा आहे. पैसे मिळाले तर आम्ही कोणाशी तरी स्टेज शेअर करतो. भले त्याने तुमच्या धर्माची चेष्टा केली असेल.

हिमांशू नावाच्या युजरने लिहिले की, स्टारचे नियंत्रण निश्चितच काही डाव्या हिंदुद्वेष्ट्यांच्या हातात आहे. अगदी स्टार स्पोर्ट्स कन्नडच्या शोमध्ये हिंदुद्वेषी बोलवण्यात आले.

मुनावर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन आहे. जो आपल्या कॉमेडी दरम्यान हिंदू देवी-देवतांची खिल्ली उडवण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. माता सीता आणि भगवान राम यांच्याबद्दल त्याने केलेले आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल झाले होते. ज्याचा देशभरातून विरोध झाला. जानेवारी 2021 मध्ये, वादग्रस्त ‘स्टॅंड-अप कॉमेडियन’ ने मध्य प्रदेशातील इंदूर येथील 56 दुकानाजवळील मनरो कॅफे येथे आयोजित कार्यक्रमात हिंदू देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल अत्यंत अपमानजनक टिप्पणी करून मोठा वाद निर्माण केला होता. कार्यक्रम संपल्यानंतर हिंदू रक्षक संघटनेच्या समर्थकांनी ‘कॉमेडियन’ला मारहाण केली आणि नंतर कार्यक्रमाच्या आयोजकांसह तुकोगंज पोलिस ठाण्यात नेले. हिंदू देवतांचा अपमान केल्याबद्दल मुनावराला एक महिना तुरुंगवास भोगावा लागला.

(हेही वाचा Muslim : लातूरमध्ये हिंदू जोडप्याला मारहाण करून मशिदीत धर्मांतर करण्याचा प्रयत्न)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.